किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलअखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुणकुमार यांचे प्रतिपादन, बंगळुरूत उद्यापासून रा. स्व. संघाची प्रतिनिधी सभा,
बंगळुरू, १७ मार्च – समाजात कार्यरत सामाजिक आणि धार्मिक संघटनांना एकत्र करून समाजव्यापी, राष्ट्रव्यापी सामाजिक शक्ती उभी करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उद्दिष्ट आहे. समाजाच्या सामूहिक शक्तीला जागरूक करण्याचे कार्य संघ करीत आहे. देश आणि समाजासाठी कार्य करणार्या समान विचारांच्या सर्व नागरिक, संघटनांना यात सोबत घेण्यासाठी संघाने पुढाकार घेतला आहे, अशी माहिती रा. स्व. संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख अरुणकुमार यांनी आज बुधवारी येथे दिली.
बंगळुरू येथील जनसेवा विद्या केंद्रात १९ आणि २० मार्च रोजी संघाच्या अ. भा. प्रतिनिधी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रपरिषदेत याबाबतची माहिती देताना अरुणकुमार बोलत होते. कोरोना संकटामुळे वर्षभरात संघाचे दैनंदिन कामकाज काही प्रमाणात संथ झाले असले, तरी स्वयंसेवकांनी या काळातही समाजाशी व्यापक संपर्क ठेवला होता. या काळात अनेक सामाजिक आणि धार्मिक संघटना व सामाजिक कार्य करणारे लोक आमच्या संपर्कात आले. आम्ही देखील अनेक संस्थांपर्यंत पोहोचलो. या व्यापक संपर्काच्या पृष्ठभूमीवर आम्ही आता अशा काही योजना हाती घेणार आहोत, ज्याद्वारे आम्ही सर्वच एकत्र येऊन सामाजिक जागरूकतेसाठी कार्य करणार आहोत. या योजनांवरही प्रतिनिधी सभेत चर्चा होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक तीन वर्षांत आम्ही आपल्या कार्याची समीक्षा करीत असतो. मागील तीन वर्षात संघ कार्याचा विस्तार, ग्राम विकास, पर्यावरण सुरक्षा (जल संवर्धन, वृक्षारोपण, प्लॅस्टिकचा कमीतकमी वापर) आणि सामाजिक परिवर्तनसाठी योजना तयार करण्यात आल्या. प्रतिनिधी सभेत या तीन वर्षांमधील कार्याबाबत महत्त्वाची चर्चा होईल. यात आम्ही काय साध्य केले, सामाजिक परिवर्तनात किती प्रगती केली, याचा उहापोह होईल. सोबतच, आगामी तीन वर्षांतील योजना आणि संघाची दिशा काय राहील, यावरही चर्चा केली जाईल, असे ते म्हणाले. संघाने आपल्या दृष्टिकोनातून ६० हजार मंडळ आणि ६० हजार वस्त्या निश्चित केल्या आहेत. यातील सुमारे ६५ हजार स्थानांपर्यंत संघ पोहोचला आहे. कार्यविस्ताराच्या दृष्टीने तेथील प्रत्येक परिवारापर्यंत संघाचे कार्य पोहोचावे, असे आमचे प्रयत्न आहेत, असे अरुणकुमार यांनी सांगितले.
प्रतिनिधी सभेच्या अनुषंगाने आज बुधवारी सायंकाळपासून उद्या गुरुवारी सायंकाळपर्यंत कार्यकारी मंडळाची बैठक होत आहे. मागील वर्षी देखील प्रतिनिधी सभा बंगळुरूतच होणार होती, पण परिस्थिती बदलली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सभा स्थगित करावी लागली. यावर्षी मात्र बंगळुरूतच सभा घेण्याचा निर्णय झाला, अशी माहिती अरुणकुमार यांनी दिली.
कोरोनामुळे संघाच्याही दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला. संघ सरकारी नियमांचे काटेकोर पालन करीत असल्याने, संघाने आपली महत्त्वाची प्रांत प्रचारक बैठक स्थगित केली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
उपस्थितांची संख्या मर्यादित
प्रतिनिधी सभेत किमान १५०० प्रतिनिधींची उपस्थिती अपेक्षित असते. मात्र, कोरोना संकट अजूनही कायम असल्याने, केवळ ४५० प्रतिनिधींनाच आमंत्रित करण्यात आले आहे. तीन दिवसांऐवजी दोन दिवस ही सभा होणार आहे, असे सांगताना अरुणकुमार म्हणाले की, संघ कार्याच्या दृष्टीने ४४ प्रांत तयार करण्यात आले आहेत. या प्रांतातील निर्वाचित प्रतिनिधी व इतर सुमारे एक हजार मान्यवर या ४४ स्थानांवरून आभासी पद्धतीने या सभेत सहभागी होतील.
नव्या सरकार्यवाहांची निवड शनिवारी
शुक्रवार, १९ मार्च रोजी सकाळी प्रतिनिधी सभेला प्रारंभ होईल. पहिले सत्र साडेआठ वाजता सुरू होईल. ९ वाजता पत्रपरिषद घेतली जाईल. सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य पत्रपरिषदेला संबोधित करतील. दर तीन वर्षांनी नव्या सरकार्यवाहांची निवडणूक होत असते. शनिवार, २० मार्च रोजी दुसर्या सत्रात नव्या सरकार्यवाहांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती अरुणकुमार यांनी दिली.