किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (१२ जानेवारी) – येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणार्यां श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा समारोहासाठी श्रीरामजन्मभूमी मंदिर निर्माण समितीतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना निमंत्रण देण्यात आले आहे. पूर्वपुण्याईचे फळ मिळाले, अशा भावना सरसंघचालकांनी यावेळी व्यक्त केल्या.
मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा आणि विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी नवी दिल्ली येथे सरसंघचालकांना रीतसर निमंत्रण पत्रिका दिली. यावेळी सरसंघचालक म्हणाले की, अशा भव्य प्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची संधी मिळणे हे फार मोठे सौभाग्य आहे. कारण, केवळ पूजेच्या दृष्टीने आपल्या आराध्याचे मंदिर एवढेच याचे महत्त्व नाही. या देशाचे पावित्र्य आणि देशाची मर्यादा स्थापना दृढ होण्याचा हा प्रसंग आहे.
संपूर्ण देशात श्रीरामाला मर्यादा पुरुषोत्तम मानले जाते. आपण स्वातंत्र्य मिळविले, त्या स्वातंत्र्यांतील ‘स्व’ म्हणजे आपली मर्यादा आहे. त्या ‘स्व’मुळेच आपली जगभरात प्रतिष्ठा आहे आणि त्यामुळेच आपले जीवन पवित्र आहे, असे डॉ. भागवत म्हणाले.
या प्रसंगी सर्वच लोक उपस्थित राहू शकणार नाहीत. काहींना निमंत्रण मिळाले आहे ते येतील. मात्र, गावागावात, घराघरात याचा उत्साह आहे. याचे कारण म्हणजे, इतक्या वर्षांनंतर भारताच्या ‘स्व’च्या प्रतिकाचे आम्ही पुनर्निर्माण केले आहे. आपल्याला अनेक दशकांपासून योग्य वाटचालीसाठी योग्य दिशेची प्रतीक्षा होती. ती दिशा सापडली आहे आणि ती स्थापितही झाली आहे. एक विश्वास सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात मंगलमय वातावरण आहे आणि अशात आम्ही तेथे प्रत्यक्ष उपस्थित राहू, त्या प्रसंगाचे साक्षीदार होऊ, त्यात सहभागी होऊ… ही आमची पूर्वपुण्याईच असावी, ज्याचे फळ आम्हाला मिळत आहे. यासाठी मी तुमचे कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. मागूनही मिळणार नाही अशी ही सुसंधी आहे, ती मिळाली आहे. मी अवश्य उपस्थित राहणार, असे म्हणत सरसंघचालकांनी या निमंत्रणाचा स्वीकार केला आहे.