किमान तापमान : 23.88° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 2.37 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.74°से. - 24.84°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल-४५ हजार कोटींचा खर्च,
नवी दिल्ली, ४ एप्रिल – भारतीय नौदलासाठी सहा अत्याधुनिक पाणबुड्या खरेदी करण्याच्या प्रक्रियेला संरक्षण मंत्रालयाने सुरुवात केली आहे. धोरणात्मक भागीदारी तत्त्वांतर्गत खरेदी करण्यात येत असलेल्या या पाणबुड्यांसाठी ४५ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
या सर्व पाणबुड्यांवर जहाजभेदी कू्रझ क्षेपणास्त्रे आणि अन्य घातक शस्त्रास्त्र प्रणाली बसविण्यात येणार आहे. पी-७५ कार्यक्रमांतर्गत भारतीय कंपनी आणि विदेशातील पाणबुड्या निर्मिती कंपनी संयुक्तपणे या पाणबुड्यांची भारतातच निर्मिती करणार आहे.
या प्रकल्पात सहभागी होऊ इच्छिणार्या विदेशी कंपन्यांना लवकरच पत्र पाठविण्यात येणार असून, या पाणबुड्यांच्या बांधणीसाठी देशातील आणि विदेशातील कोणत्या कंपन्यांची निवड करायची, ही प्रक्रिया संरक्षण मंत्रालयाने सुरू केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी मंत्रालयाने जानेवारीत सर्वाधिकार समिती गठित केली होती. या समितीने देशातील कंपन्यांची निवड करण्यासाठी आवश्यक असलेल्या चर्चेच्या फेर्या पूर्ण केल्या आहेत. यात अदानी डिफेन्स, एल अॅण्ड टी, तसेच माझगाव डॉक शिपबिल्डर्स या कंपन्यांवर चर्चा करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.