किमान तापमान : 24.75° से.
कमाल तापमान : 26.24° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.52 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.24° से.
23.74°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी कुछ बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलपंतप्रधान मोदी यांची घोषणा,
अहमदाबाद, २ ऑक्टोबर – महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतिनिमित्त येथील साबरमती नदीच्या काठावर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी भारत हागणदारीमुक्त देश झाल्याची घोषणा केली. आपल्या सरकारने संपूर्ण देशात स्वच्छता मोहीम राबवली. महात्मा गांधींच्या सत्याग्रहाला जनतेचा जसा पाठिंबा लाभला, तसाच व्यापक पाठिंबा या स्वच्छताग्रहाला लाभला. लोकांनी स्वच्छतेला जणू आंदोलनच बनवले, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.
अवघ्या ६० महिन्यांत ६० कोटी जनतेला माझ्या सरकारने शौचालये उपलब्ध करून दिलीत. १३० कोटी जनतेचा देश इतक्या कमी कालावधीत हागणदारीमुक्त झाला, याचे संपूर्ण जगालाच आश्चर्य आहे. अनेक देशांनी यासाठी भारताकडे सहकार्य मागितले आहे.
देशाला आता एकेरी वापराच्या प्लॅस्टिकपासून मुक्ती देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. २०२२ पर्यंत हे उद्दिष्ट आम्ही पूर्ण करणार आहोत. ही मोहीम यशस्वी ठरण्यासाठी जनतेला एकेरी वापराच्या प्लॅस्टिकचा त्याग करावाच लागणार आहे. तसा संकल्पच त्यांनी करायला हवा. याचा लाभ पर्यावरणालाही मिळणार आहे, तसेच देशभरातील रस्ते आणि गटारे तुंबण्यासाठी कारणीभूत ठरणार्या प्लॅस्टिकच्या या समस्येवर आपल्यालाच तोडगा काढावा लागणार आहे. आपले पशूधन आणि सागरी जीवांचेही रक्षण यामुळे होणार आहे, असे मोदी यांनी सांगितले.
समाजात आणि देशात परिवर्तन आणायचे असेल, तर त्याची सुरुवात आपण स्वतःपासून करायला हवी. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांनी हीच शिकवण आपल्याला दिली आहे. जलजीवन मोहिमेवर आपले सरकार साडेतीन लाख कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. मात्र, देशवासीयांच्या सक्रिय सहभागाशिवाय हे महत्त्वाकांक्षी कार्य पूर्ण होणार नाही. स्वच्छता, पर्यावरणाचे रक्षण आणि सर्व प्रकारच्या जीवांची सुरक्षा, हे तीन विषय महात्मा गांधींसाठी महत्त्वाचे होते. पण, या तिन्ही घटकांना एकेरी वापराच्या प्लॅस्टिकमुळे धोका निर्माण झाला. मागील तीन आठवड्यांत ‘स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही गती दिली. या काळात सुमारे २० हजार टन प्लॅस्टिकचा कचरा जमा करण्यात आला. स्वच्छ भारताची ही मोहीम येथे संपणार नाही, ती निरंतर सुरू राहील. आज आम्ही जे उद्दिष्ट गाठले आहे, ते फक्त या मोहिमेचा एक टप्पा आहे. ६० कोटी जनतेला शौचालये उपलब्ध करून, त्याचा वापर करण्यासाठी प्रेरित केले. ही सवय कायम राहावी यासाठी आम्ही कार्य करणार आहोत.
७५ लाख लोकांना रोजगार
स्वच्छ भारत अभियान असंख्य गरिबांसाठी जीवनरक्षक सिद्ध झाले आहे. यामुळे जनतेचा जीवनस्तरही उंचावला आहे. युनिसेफच्या एका अहवालानुसार मागील पाच वर्षांत या अभियानामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर २० लाख कोटी रुपयांचा सकारात्मक परिणाम पडला आहे. यामुळे ७५ लाख लोकांना रोजगार तर मिळालाच, शिवाय आजाराचे प्रमाण कमी होऊन उपचारावरील खर्चही घटला. याचा फायदा गरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण देण्यास झाला. अनेक जीवघेण्या आजारांवर स्वच्छतेने मात केली आहे.
जागतिक पातळीवर भारताची उंची वाढली
जागतिक पातळीवर भारताची उंची वाढली आहे. भारताच्या वाढलेल्या मानाची प्रचिती अलिकडेच ह्युस्टन येथे झालेल्या हाऊडी मोदी कार्यक्रमात आली, असे पंतप्रधान मोदी यांनी भाजपा पदाधिकार्यांनी केलेल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले.
भारतात होत असलेले सकारात्मक बदलांची दखल जग घेत आहे. ह्युस्टन येथे झालेल्या कार्यक्रमात रिपब्लिकन आणि डेमॉक्रेट पक्षाच्या नेत्यांनी भाषणे केली. या कार्यक्रमातील त्यांची विशेष उपस्थिती होती. प्रत्येकाला सोबत घेऊन चालण्यावर भारताला विश्वास आहे. त्याची नोंद या कार्यक्रमात घेण्यात आली. सर्वत्र भारताबाबतचा आदर वाढत आहे. याचा मी स्वतः अनुभव घेतला, असेही ते म्हणाले. भारतीय पासपोर्टची क्षमता आणि मूल्य वाढले आहे. भारतीय पासपोर्ट धारण करणार्या व्यक्तीकडे आदराने पाहिले जाते, असेही त्यांनी सांगितले.
साबरमती आश्रमात महात्मा गांधींना आदरांजली
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज बुधवारी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपित्याला आदरांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी येथील संग्रहालयास भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी साबरमती आश्रमातील महात्मा गांधी यांच्या हृदयकुंज या निवासस्थानालाही भेट दिली. येथील नोंदणी पुस्तिकेत विचार लिहून त्यांनी २० मिनिटे येथे घालवली.