|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:34 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 29.24° से.

कमाल तापमान : 29.74° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 62 %

वायू वेग : 6.44 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

29.74° से.

हवामानाचा अंदाज

27.62°से. - 29.99°से.

रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

28.31°से. - 30.78°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.42°से. - 30.77°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.62°से. - 29.71°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.24°से. - 29.69°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.06°से. - 29.32°से.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » सेमीकंडक्टर्स; केंद्राचे पाऊल ठरेल कलाटणी देणारे

सेमीकंडक्टर्स; केंद्राचे पाऊल ठरेल कलाटणी देणारे

नोकर्‍या वाढतील आणि वस्तूही होणार स्वस्त,
नवी दिल्ली, १६ डिसेंबर – सेमीकंडक्टर्सच्या बाबतीत भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी मोदी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने पीएलआय योजनेअंतर्गत सुमारे ७६ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत, ज्यामुळे भारताला सेमीकंडक्टरच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यास मदत होईल.
सरकारचे हे कलाटणी देणारे ठरू शकते. कारण, यामुळे देश सेमीकंडक्टरच्या बाबतीत स्वावलंबी होईल तर, दुसरीकडे रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. अनेक नवीन स्टार्टअप्स देखील तयार होतील, ज्यातून भविष्यात देशाला आणखी काही युनिकॉर्न मिळतील अशी अपेक्षा आहे.
सेमीकंडक्टर्सच्या बाबतीत भारताला स्वावलंबी बनवल्यास लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे सरकारने म्हटले आहे. सेमीकंडक्टर डिझाइन करण्यासाठी सुमारे ८५००० प्रतिभावान अभियंत्यांची फौज लागेल, असा सरकारचा कयास आहे. त्याचबरोबर सरकार सेमीकंडक्टर बनवण्याशी संबंधित सर्व उद्योगही उभारणार असून, त्यामुळे अधिक लोकांना रोजगार मिळेल. वाहनांव्यतिरिक्त, सेमीकंडक्टरचा वापर स्मार्टफोन, स्मार्टवॉच, लॅपटॉप, डेटा सेंटर, कॉम्प्युटर, टॅबलेट, एटीएम, रेफ्रिजरेटर-वॉशिंग मशिन यांसारख्या गोष्टींमध्ये ऍग्रीटेक उपकरणांसह घरात वापरला जातो. म्हणजेच सेमीकंडक्टरशिवाय अनेक उपकरणे रखडतील.
सेमीकंडक्टर म्हणजे काय?
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, सेमीकंडक्टर कोट्यवधी उत्पादनांसाठी त्यांच्या हृदयासारखे आहे.
हे कंडक्टर आणि नॉन-कंडक्टर किंवा इन्सुलेटर यांच्यातील दुवा आहे. यामध्ये विद्युत प्रवाह वाहून नेण्याची क्षमता धातू आणि सिरॅमिक्स सारख्या इन्सुलेटरपेक्षा खूप जास्त आहे. सेमीकंडक्टर चिप्स प्रामुख्याने सिलिकॉनच्या बनलेल्या असतात. सेमीकंडक्टरचे काम सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांना उर्जा देणे आहे. याद्वारे तुम्ही जलद संगणन, ऑपरेशन कंट्रोल, डेटा प्रोसेसिंग, स्टोरेज, इनपुट-आउटपुट मॅनेजमेंट, सेन्सिंग, वायरलेस कनेक्टिव्हिटी करू शकता. म्हणजेच त्याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग, प्रगत वायरलेस नेटवर्क, ब्लॉकचेन ऍप्लिकेशन्स, रोबोट्स, ड्रोन, गेम्स, स्मार्टवॉच आणि ५-जी तंत्रज्ञानाची कल्पनाही करता येणार नाही.

Posted by : | on : 17 Dec 2021
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g