किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलरिझर्व्ह बँकेचा निर्णय,
नवी दिल्ली, १६ डिसेंबर – शेड्युल्ड पेमेंट्स बँक आणि शेड्युल्ज स्मॉल फायनान्स बँकांना सरकारी व्यवसाय करण्याची परवानगी भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचा पेटीएम पेमेंट्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेसारख्या कंपन्यांना फायदा होणार आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयासोबत सल्लामसलत करून या बँकांना सरकारी व्यवसाय करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे रिझर्व्ह बँकेने १५ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले होते. वित्तीय सेवा विभागासोबत झालेल्या चर्चेनंतर शेड्युल्ड पेमेंट्स बँक आणि शेड्युल्ड स्मॉल फायनान्स बँकांना सरकारी व्यवसाय करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी व्यवसाय करण्यास उत्सुक असलेल्या पेमेंट्स आणि स्मॉल फायनान्स बँकांना रिझर्व्ह बँकेसोबत करार करावा लागणार आहे. निर्धारित नियमांच्या चौकटीत असलेल्या अशा प्रकारच्या बँकांना सरकारी व्यवसाय करण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे एजंट केले जाऊ शकते.
या बँकांना होणार फायदा
रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचा फायदा पेटीएम पेमेंट्स बँक, फिनो पेमेंट्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेला होणार आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेचा याच महिन्यात रिझर्व्ह बँक कायद्याच्या दुसर्या शेड्युलमध्ये समावेश करण्यात आला आहे. असा दर्जा प्राप्त करणार्या फायनान्स कंपन्यांना रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरावर कर्ज उपलब्ध होते. मात्र, त्यांनी क्रेडिट कार्ड वितरित करण्याची परवानगी मिळत नाही.