किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलचित्रकूट, १५ डिसेंबर – सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी धर्मत्याग केलेल्या हिंदूंना स्वधर्मात परत येण्याचे, तसेच त्यांना परत आणण्याचे आवाहन आज बुधवारी येथे केले. मध्यप्रदेशातील चित्रकूट येथे आयोजित हिंदू एकता महाकुंभात सहभागी होताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी हिंदू धर्म सोडून इतर धर्मात प्रवेश घेतलेल्यांना पुन्हा आपल्या धर्मात घेण्यासंबंधीची शपथ उपस्थितांना दिली. यावेळी सरसंघचालक म्हणाले की, प्रभू श्रीराम यांनी स्वत:साठी राक्षसांशी युद्ध केले नाही. त्यांनी हे सर्व समाजासाठी केले. रामाकडून आदर्श शिकताना आपण स्वत:साठी नव्हे तर, आपल्या आप्तेष्टांसाठी काम केले पाहिजे. संपूर्ण समाज एकत्र यायचा असेल तर, अहंकार विसरून स्वार्थ सोडून आपल्या माणसांसाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना हिंदू धर्म संरक्षणाची शपथ दिली.
हिंदू संस्कृतीचे शूर योद्धा प्रभू राम यांच्या संकल्पस्थळी मी सर्वशक्तिमान देवाला साक्षीदार म्हणून शपथ घेतो की, माझ्या पवित्र हिंदूंच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी मी आयुष्यभर काम करीन. धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज मी प्रतिज्ञा करतो की, मी कोणत्याही हिंदूला हिंदू धर्मापासून मुक्त होऊ देणार नाही. धर्म सोडलेल्यांना स्वधर्मात परत आणण्यासाठी काम करेन. मी वचन देतो की हिंदू भगिनींच्या सुरक्षेसाठी मी सर्व काही देईन. जात, पंथ याच्या वर उठून समाजाला सक्षम बनविण्यासाठी मी माझ्या सर्व शक्तिनिशी काम करेन, अशी शपथ डॉ. भागवत यांनी उपस्थितांना दिली.
११०० शंखांच्या नादाने महाकुंभाची सुरुवात
या हिंदू महाकुंभाची सुरुवात मंगळवारी ११०० शंखांच्या नादाने झाली. या महाकुंभात देशभरातून अनेक मान्यवर उपस्थिती होते. तुलसीपीठाधीश्वर श्री रामभद्राचार्य यांनी याचे आयोजन केले आहे. श्री श्री रविशंकर यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केले. काही लोक जमले की भीती वाटते. पण, जेथे संत आणि हिंदू एकत्रित येतात तिथे अभय असते. मुळात, देशभक्ती आणि ईश्वर भक्ती एकच आहे. जो देशभक्त नाही तो ईश्वर भक्तही होऊ शकत नाही, असेही रविशंकर यावेळी बोलताना म्हणाले.