किमान तापमान : 30.33° से.
कमाल तापमान : 30.77° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 52 %
वायू वेग : 4.01 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.77° से.
27.48°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (१७ फेब्रुवारी) – संस्कृतचे विद्वान जगद्गुरू रामभद्राचार्य आणि प्रख्यात कवी गुलझार यांना शनिवारी ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला. ज्ञानपीठ निवड समितीने याबाबत घोषणा केली. रामभद्राचार्य चित्रकुटातील तुलसीपीठाचे संस्थापक आहेत. ते प्रख्यात हिंदू अध्यात्मिक नेते, शिक्षक आणि १०० पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखक आहेत. १९५० मध्ये उत्तरप्रदेशातील जौनपूरमधील खांदीखुर्द गावात जन्मलेले रामभद्राचार्य रामानंद संप्रदायाच्या चार जगद्गुरू रानानंदचार्यांपैकी एक आहेत.
त्यांचे २२ भाषांवर प्रभुत्व आहे तसेच संस्कृत, हिंदी, अवधी, मैथिलीसह कित्येक भाषांमध्ये लेखन केले आहे. भारत सरकारने २०१५ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केेले होते. गुलझार हे हिंदी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानासाठी ओळखले जातात. ते या काळातील सर्वोत्तम उर्दू कवी समजले जातात. यापूर्वी २००२ मध्ये त्यांना साहित्य अकादमीचा, २०१३ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, २००४ मध्ये पद्मभूषण तसेच चित्रपटसृष्टीत आपल्या कामाद्वारे उमटवलेल्या अमीट ठशासाठी किमान पाच राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.