किमान तापमान : 29.33° से.
कमाल तापमान : 30.02° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.33° से.
27.34°से. - 30.76°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– भाजपाच्या द्विदिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा थाटात शुभारंभ,
नवी दिल्ली, (१७ फेब्रुवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शब्दांवर (गॅरंटी) देशातील जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक जिंकून मोदी लोकसभा निवडणुकीतील विजयाची हॅट्ट्रिक करतील, असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज व्यक्त केला. पश्चिम बंगालमध्ये लवकरच भाजपाचे सरकार आलेले तुम्हाला दिसेल, असेही ते म्हणाले.
प्रगती मैदानस्थित भारतमंडपम्मध्ये भाजपाच्या द्विदिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा शुभारंभ झाला, त्यावेळी आपल्या उद्घाटनपर भाजपात नड्डा बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाचे राष्ट्रीय पदाधिकारी, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मु‘यमंत्री व्यासपीठावर उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. भाजपाचा ध्वज नड्डा यांच्या हस्ते फडकविण्यात आला. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भाजपाला अच्छे दिन आले आहेत. त्यामुळे भाजपा ३७० जागा जिंकेल तसेच रालोआसह आम्ही चारशेपेक्षा जास्त जागा जिंकू, असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला.
भारतीय जनसंघ ते भाजपा अशा सात दशकाच्या प्रवासात आम्ही सर्व प्रकारचा काळ पाहिला, संघर्षाचा काळ पाहिला तसेच उपेक्षेच्या काळाचाही अनुभव घेतला, असे स्पष्ट करत नड्डा म्हणाले की, जमानत वाचविण्यासाठी निवडणूक लढवण्याचा काळही पाहिला. निवडणुकीतील जय-पराजयचाही अनुभव घेतला. आणिबाणीचाही काळ पाहिला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील गेल्या दहा वर्षांचा कार्यकाळ आमच्यासाठी सर्वांत आनंदाचा, अभिमानाचा तसेच मोठ्या उपलब्धीचा काळ होता.
भाजपा आज जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष आहे. २०१४ च्या आधी देशातील फक्त पाच राज्यांत भाजपाची सरकारे होती. बराच काळ आम्ही पाच-सहा राज्यांतच अडकलो होतो. आज देशातील १७ राज्यात रालोआची तर डझनभर राज्यात भाजपाची सरकारे आहेत, असे नड्डा यांनी सांगितले. उत्तरप्रदेशात २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही सलग दुसर्यांदा विजय मिळवला. उत्तराखंडमध्ये सलग दुसर्यांदा कोणताही पक्ष जिंकत नाही, हा समजही खोटा ठरवला. त्याचप्रमाणे मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये नेत्रदीपक विजय मिळवला, असे ते म्हणाले.
प. बंगालमध्ये भाजपाचे सरकार येणार
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा जनाधार वाढत आहे. दहा टक्के मते आणि तीन जागांवरून २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही राज्यात ३८.५० टक्के मते आणि ७७ जागा जिंकलो. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्येही आमची सत्ता असेल, असे नड्डा यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.