किमान तापमान : 30.86° से.
कमाल तापमान : 32.28° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 44 %
वायू वेग : 2.33 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
32.28° से.
27.71°से. - 32.99°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.26°से. - 30.15°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.44°से. - 29.38°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.92°से. - 29.75°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.79°से. - 29.45°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल25.83°से. - 29.54°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाशसर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आश्चर्य,
नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर – लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी पुन्हा उत्तरप्रदेश सरकारला फटकारले. घटनास्थळी हजारोंची गर्दी होती, तरीही आतापर्यंत केवळ २३ प्रत्यक्षदर्शी सापडले, असा सवाल न्यायालयाने केला. न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकारला या घटनेच्या साक्षीदारांना सुरक्षा पुरवण्याचा आणि साक्षीदारांचे जबाब तातडीने नोंदवण्याचा आदेशही दिला.
लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीत स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी विनंती करणार्या याचिकेवर सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा, न्या. सूर्य कांत आणि न्या. हिमा कोहली यांच्या न्यायासनात सुनावणी झाली. ८ नोव्हेंबरला पुन्हा या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी न्यायालयात उत्तरप्रदेश सरकारची बाजू मांडली. ६८ साक्षीदारांपैकी ३० साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून, २३ जणांनी या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचा दावा केला आहे, असे साळवे म्हणाले. यावर सरन्यायाधीश म्हणाले की, शेतकर्यांची मोठी रॅली होती, शेकडो शेतकरी उपस्थित होते, मग केवळ २३ प्रत्यक्षदर्शी सापडले का, यानंतर साळवे यांनी सांगितले की, या लोकांनी कार आणि त्यामधील लोकांना पाहिले आहे.
घटनास्थळी चार ते पाच हजार लोकांचा जमाव होता. त्यात सर्व स्थानिक होते आणि या घटनेनंतरही आंदोलने करीत होते, असे न्यायालयाला सांगण्यात आले. मागील सुनावणीतही सर्वोच्च न्यायालयाने साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात उशीर केल्याबद्दल उत्तरप्रदेश सरकारला फटकारले होते. उत्तरप्रदेश सरकारने साक्षीदारांचे जबाब जाहीर करण्यासाठी वेळ मागितल्यानंतर न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली होती आणि पुढील सुनावणी २६ ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला होता.