किमान तापमान : 30.02° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 2.46 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.48°से. - 31.19°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.76°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.88°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 30.23°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.3°से. - 30.25°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.38°से. - 29.76°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, २६ ऑक्टोबर – आगामी विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोग वयोवृद्ध, दिव्यांग तसेच कोरोनाबाधितांना घरातूनच मतदान करण्याची सुविधा देणार आहे. यासाठीची तयारी जोरात सुरू असून, पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत अशी सुविधा दिली जाणार आहे.
आतापर्यंत केवळ पोलिस कर्मचारी, निवडणूक कर्तव्यावर असणारे कर्मचारी, लष्करातील अधिकारी आणि शिपाई यांनाच पोस्टल बॅलेटचा वापर करता येत होता. देशात यंदा पहिल्यांदाच ही सुविधा वयोवृद्ध, दिव्यांग तसेच कोरोनाबाधितांसाठी सुरू केली जाणार आहे. याअंतर्गत ८० वर्षांहून अधिक वय असणार्या वृद्धांची इच्छा असल्यास घरातूनच पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मताधिकार बजावू शकणार आहेत. याचप्रमाणे दिव्यांग आणि कोरोनाबाधितांनाही ही सुविधा वापरता येणार आहे. त्यासाठी पात्र मतदारांना प्रथम फॉर्म १२ भरावा लागणार आहे. अर्थात, यातील वयोवृद्ध किंवा दिव्यांग ज्यांना मतदान केंद्रांवर जायचे आहे, त्यांना हे ऐच्छिक असेल. फक्त कोरोधाबाधितांना किंवा संशयित बाधितांना मतदान केंद्रांवर सर्वात शेवटी प्रवेश दिला जाईल. त्यांना पीपीई किट घालूनच मतदान करता येणार आहे.