किमान तापमान : 28.55° से.
कमाल तापमान : 29.67° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 2.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.55° से.
27.91°से. - 30.83°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.32°से. - 30.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 29.25°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.09°से. - 29.82°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.89°से. - 29.89°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.34°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, २६ ऑक्टोबर – येत्या काही महिन्यांत केंद्र सरकारकडून देशातील १३ विमानतळांचे खाजगीकरण करण्यात येणार आहे. या विमानतळांचा ताबा सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे आहे. परंतु, मार्च २०२२ पर्यंत या विमानतळांचा कारभार खाजगी कंपन्यांच्या हातात सोपवला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय चलनीकरण योजनेची घोषणा केली होती. या माध्यमातून तोट्यात असलेल्या सरकारी उपक्रमांच्या मालमत्ता विकून निधी उभारण्याची योजना आहे. त्याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून देशातील १३ विमानतळांचे खाजगीकरण होणार असल्याचे समजते.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीव कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. आम्ही पीपीपी तत्त्वावर चालवण्यासाठी १३ विमानतळांची यादी नागरी उड्डयन मंत्रालयाला पाठवली आहे. त्यानुसार यंदाच्या आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत या विमानतळांची लिलाव प्रक्रिया पार पाडण्याचे प्रयत्न केले जातील, असे संजीव कुमार यांनी सांगितले.
संबंधित हवाई मार्गांवरील प्रत्येक प्रवाशापोटी मिळणारे उत्पन्न लक्षात घेऊन विमानतळांचा लिलाव केला जाईल. यापूर्वी अशा पद्धतीने लिलावप्रक्रिया यशस्वी पूर्ण झाल्याचे संजीव कुमार यांनी म्हटले.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने गेल्या महिन्यात १३ विमानतळांच्या खाजगीकरणाला मंजुरी दिली होती. यात सहा मोठ्या आणि सात लहान विमानतळांचा समावेश आहे. केंद्र सरकारने २०२४ पर्यंत राष्ट्रीय चलनीकरण योजनेच्या माध्यमातून सरकारी मालमत्तांची विक्री करून ३६६० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
कोणत्या विमानतळांचा समावेश?
खाजगीकरण प्रस्तावित असलेल्या १३ विमानतळांमध्ये वाराणसी, कुशीनगर, गया, अमृतसर, कांग्रा, भुवनेश्वर आणि तिरुपती या सहा बड्या विमानतळांचा समावेश आहे. तर लहान विमानतळांमध्ये रायपूर, औरंगाबाद, इंदूर, जबलपूर, त्रिची आणि हुबळीचा समावेश आहे. राष्ट्रीय चलनीकरण योजनेंतर्गत येत्या चार वर्षात देशातील २५ विमानतळांचे खाजगीकरण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.