किमान तापमान : 27.9° से.
कमाल तापमान : 27.96° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 63 %
वायू वेग : 3.4 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.96° से.
27.78°से. - 31.24°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.76°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.88°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 30.23°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.3°से. - 30.25°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.38°से. - 29.76°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादलबांगलादेशातील हिंसाचारावर संघ करणार चिंतन : सुनील आंबेकर,
बंगळुरू, २६ ऑक्टोबर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक २८ ते ३० ऑक्टोबर या दरम्यान कर्नाटकच्या धारवाड येथे होणार आहे. यात नवरात्रौत्सवात बांगलादेशात हिंदूंवर झालेले सामूहिक हल्ले आणि हत्याकांडावर रा. स्व. संघ चिंतन करणार असल्याची माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी आज येथे एका पत्रपरिषदेत दिली.
बांगलादेशात नवरात्रौत्सवाच्या काळात हिंदूंवर सातत्याने हल्ले झाले. या हिंसाचारात निरपराध हिंदूंची हत्या करण्यात आली. बांगलादेशातील घटनांची जगभरात निर्भर्त्सना करण्यात आली. संघाच्या बैठकीत या हिंसाचारावर चिंतन आणि चर्चा होणार आहे. त्यासोबतच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भारताच्या स्वत्त्वाचे जागरण करण्याच्या उद्देशाने आणि स्वातंत्र्य युद्धातील अनाम वीरांची माहिती जगापुढे मांडण्याच्या हेतूने बैठकीत चर्चा होणार असल्याचे आंबेकर यांनी स्पष्ट केले.
सेवाकार्यासाठी १० लाख स्वयंसेवक सज्ज
कोरोना संकटाच्या काळात रा. स्व. संघ आणि सेवा भारतीने समाजातील विविध घटकांना मदत पुरवण्याचे काम केले. कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेच्या पृष्ठभूमीवर कार्यकर्त्यांना सेवाकार्यासाठी प्रशिक्षित केले जावे, असा निर्णय जुलै महिन्यातील प्रांत प्रचारकांच्या बैठकीत झाला होता. त्यानुसार देशातील दीड लाख ठिकाणी राबवण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत १० लाख स्वयंसेवकांना सेवा कार्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आल्याचे आंबेकर म्हणाले. तसेच भविष्यातील संभाव्य आरोग्य समस्यांचा सामना करण्याच्या हेतूने बैठकीत चिंतन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीचे उद्दिष्ट आणि स्वरूप
दरवर्षी जुलै महिन्यात होणार्या प्रचारकांच्या बैठकीत कार्यविस्ताराशी संबंधित योजनांची आखणी केली जाते. त्या बैठकीत जे ठरले होते, त्या कामाची स्थिती काय आहे, त्यात कितपत यशापयश मिळाले, याचा आढावा घेण्याच्या दृष्टीने रा. स्व. संघ ऑक्टोबर महिन्यात अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक बोलावतो. त्यात देशभरातील प्रांतांचे संघचालक, कार्यवाह आणि प्रांत प्रचारक सहभागी होतात.
कर्नाटकच्या धारवाडच्या राष्ट्रोत्थान केंद्रात २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान चालणार्या तीन दिवसीय बैठकीत देशभरातील सुमारे ३५० स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. गुरुवारी २८ ऑक्टोबर रोजी सुरू होणारी बैठक शनिवार ३० ऑक्टोबर रोजी दुपारनंतर समाप्त होईल. या बैठकीत नियोजित कार्याची समीक्षा आणि कार्य विस्ताराच्या योजनेवर चर्चा होणार आहे.