किमान तापमान : 27.64° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.17 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.79°से. - 31.2°से.
रविवार, 17 नोव्हेंबर कुछ बादल26.75°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 30.31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.46°से. - 30.28°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.42°से. - 29.88°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.21°से. - 29.64°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादलपाटणा, २७ ऑक्टोबर – आठ वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या हुंकार रॅलीत घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने १० आरोपींपैकी एका आरोपीची निर्दोष मुक्तता केली, तर इतर सर्व ९ आरोपींना दोषी ठरविले आहे. पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या आरोपीचे नाव फखरुद्दीन असे आहे. सर्व आरोपींना येत्या १ नोव्हेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणी आतापर्यंत १८७ जणांची कोर्टात सुनावणी झाली आहे.
पाटण्यातील गांधी मैदानात ८ वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅलीत एकामागून एक अनेक बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी २७ ऑक्टोबर २०१३ ला पाटणा येथील पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. यानंतर ३१ ऑक्टोबर २०१३ ला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या प्रकरणाची सूत्रे हाती घेतली व १ नोव्हेंबरला दिल्ली एनआयए पोलिस ठाण्यात पुन्हा एफआयआर नोंदविण्यात आला. यामध्ये एका अल्पवयीन मुलासह १२ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अल्पवयीन आरोपीला यापूर्वीच जुवेनाईल बोर्डाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
अन्य प्रकरणात ५ जणांना आधीच जन्मठेपेची शिक्षा
या प्रकरणातील आरोपी ५ दहशतवाद्यांना यापूर्वीच अन्य एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये उमर सिद्दीकी, अझरुद्दीन, अहमद हुसेन, फक्रुद्दीन, फिरोज आलम उर्फ पप्पू, नुमान अन्सारी, इफ्तिखार आलम, हैदर अली उर्फ अब्दुल्ला उर्फ ब्लॅक ब्युटी, मोहम्मद आलम उर्फ पप्पू मोजिबुल्ला अन्सारी व इम्तियाज अन्सारी ऊर्फ आलम यांचा समावेश आहे. यापैकी इम्तियाज, उमर, अझहर, मोजिबुल्ला व हैदरलासुद्धा बोधगयामधील साखळी बॉम्ब स्फोटप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.