किमान तापमान : 28.63° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 3.01 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.84°से. - 30.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर कुछ बादल27.29°से. - 30.38°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.62°से. - 29.87°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.06°से. - 29.89°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल26.05°से. - 29.46°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.8°से. - 29.31°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादलअमित शाहांनी काश्मिरी अधिकार्यांना सुनावले,
नवी दिल्ली, २७ ऑक्टोबर – गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीवर स्थानिक अधिकारी कारवाई करू इच्छित नाहीत, असे गुप्तचर खात्याच्या अधिकार्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगितले. यावर, ज्या अधिकार्यांना भीती वाटते, त्यांनी काश्मीरमध्ये काम करू नये, दुसर्या ठिकाणी बदली करून घ्यावी, अशा शब्दांत शाह यांनी खडसावले.
गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरच्या दौर्यात गुप्तचर खात्यातील अधिकार्यांची बैठक घेतली. अधिकार्यांनी गृहमंत्र्यांना जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाला आळा घालण्यासाठी त्यांच्या शैलीबद्दल सांगितले. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीवर स्थानिक अधिकारी कारवाई करू इच्छित नाहीत, असेही सांगितले. अमित शाह यांनी त्यांच्या दौर्यात थेट सुरक्षा अधिकार्यांना जम्मू-काश्मिरमधील दहशतवाद संपवण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यास सांगितले.
गृहमंत्र्यांनी शनिवारी त्यांच्या दौर्यात जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या बैठकीत त्यांच्यासह नायब राज्यपाल मनोज सिन्हा, जम्मू-काश्मीर पोलिस, लष्कर, निमलष्करी दल आणि गुप्तचर यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नुकत्याच खोर्यातून अनेक नागरिकांच्या हत्येच्या घटना समोर आल्या असतानाच गृहमंत्र्यांचा हा दौरा झाला आहे.
शाह म्हणाले की, ज्या अधिकार्यांना भीती वाटत असेल, त्यांनी आपली बदली दुसरीकडे करून घ्यावी. या दौर्यात शाह यांनी लष्कराच्या कमांडरशीही चर्चा केल्याचे समजते. घुसखोरी सातत्याने कमी होत असल्याचे अधिकार्याने सांगितले. २०२१ मध्ये घुसखोरीच्या फक्त ११ घटना घडल्या. त्यावर अमित शाह यांनी, नागरिकांच्या हत्यांचे प्रमाणही कमी झाले पाहिजे. घुसखोरीच्या घटना कमी झाल्या असत्या तर आतापर्यंत खोर्यातील दहशतवाद आणि लोकांच्या हत्येच्या घटना पूर्णपणे संपायला हव्या होत्या. मात्र, असे झाले नाही. हे योग्य उत्तर आहे, असे तुम्हाला वाटते का, असा सवाल त्यांनी अधिकार्यांना केला.
दहशतवाद झुगारून लावा
अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौर्यात सर्वसामान्य नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी काही धाडसी पावलेही उचलली. काश्मिरी नागरिकांचा निरोप घेताना त्यांनी काश्मिरींना दहशतवाद झुगारून लावा, असे आवाहन केले. अतिरेक्यांची संख्या फार कमी आहे. तुमच्या पाठीशी सुरक्षा दलांचे जवान आणि केंद्र सरकार असल्याने घाबरण्याचे कारण नाही, अशा शब्दांत अमित शाह यांनी तरुणांना विश्वास दिला.