किमान तापमान : 28.63° से.
कमाल तापमान : 28.87° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 3.01 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.87° से.
27.84°से. - 30.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर कुछ बादल27.29°से. - 30.38°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.62°से. - 29.87°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.06°से. - 29.89°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल26.05°से. - 29.46°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.8°से. - 29.31°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादलबालासोर, २७ ऑक्टोबर –
ओडिशातील बालासोरच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्या अग्नी-५ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. पाच हजार किमीची मारक क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र आज बुधवारी सकाळी साडेसात वाजता चाचणीसाठी झेपावले. अग्नी-५ क्षेपणास्त्रामुळे भारतीय लष्कराचे बळ वाढले आहे.
कोणत्याही अस्त्रांचा वापर सर्वप्रथम न करण्याचे धोरण कायम राहणार आहे, असे केंद्र सरकारने या चाचणीनंतर स्पष्ट केले आहे. भारत केवळ स्वतःची शक्ती वाढवत आहे. अग्नी-५ क्षेपणास्त्राचा समावेश झाल्याने भारतीय लष्कराची शक्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्यानंतर चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अस्वस्थ झाले आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता नेमकी किती याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
अग्नी-५ क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये
अग्नी-५ क्षेपणास्त्राची मारक क्षमता पाच हजार किमी असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात हे क्षेपणास्त्र त्यापेक्षा जास्त अंतर कापू शकते, असे म्हटले जाते. क्षेपणास्त्राचे इंजिन अधिक शक्तिशाली करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले आहे. अग्नी-५ क्षेपणास्त्राचे इंजिन पहिल्या तीन टप्प्यांत घन इंधनाचा वापर करेल. त्यामुळे पाच हजार किमीवरील लक्ष्यांचा अचूक वेध घेण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आले.
१५०० किलोचे अण्वस्त्र वाहण्यास सक्षम
अग्नी-५ क्षेपणास्त्र १५०० किलो वजनाचे अण्वस्त्र वाहण्यास सक्षम आहे. या क्षेपणास्त्रात तीन टप्प्यांतील रॉकेट बूस्टर वापरण्यात आले. हे बूस्टर घन इंधनावर आधारित आहेत. या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनिपेक्षा २४ पटीने अधिक आहे. म्हणजेच एका सेकंदात हे क्षेपणास्त्र ८.१६ कीमीचे अंतर कापते.
कित्येक लक्ष्य उद्ध्वस्त करण्याची क्षमता
या क्षेपणास्त्रात एमआयआरव्ही (मल्टिपल इंडिपेन्डन्ट रीएंट्री व्हेईकल) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे एकाच क्षेपणास्त्रावर कित्येक वॉरहेड ठेवले जाऊ शकतात आणि हे क्षेपणास्त्र एकाच वेळी कित्येक लक्ष्य उद्ध्वस्त करण्यास सक्षम आहे. या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून संपूर्ण आशिया, युरोप आणि आफ्रिकेच्या काही भागांत हल्ला करण्याची क्षमता भारताला प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे.
पाच हजार किमी मारक क्षमता
वजन ५० हजार किलो
उंची १७.५ मीटर्स
व्यास २ मीटर्स
म्हणजेच ६.७ फूट