किमान तापमान : 24.72° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 6.9 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
23.71°से. - 28.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (०८ डिसेंबर) – अंतराळ विज्ञानातील प्रगतीच्या दृष्टीने २०२४ हे वर्ष भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. या काळात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) तीन मोठ्या रॉकेटसह महत्त्वाच्या मोहिमा अवकाशात पाठवणार आहे. लाँच व्हेईकल मार्क ३ (एलव्हीएम-३) वरून प्रक्षेपण होणार असल्याचे सरकारने राज्यसभेत सांगितले. त्याच वेळी, पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (पीएसएलव्ही) द्वारे सहा मोहिमा पाठवल्या जातील आणि तीन मोहिमा जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (जीएसएलव्ही) द्वारे पाठवल्या जातील.
पीएमओ मधील केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, अवकाशात आणखी काही मोहिमा पाठवण्याची योजना आहे. देशाच्या तांत्रिक क्षमतेचे प्रदर्शन करणारा हा उपग्रह नवीन रॉकेट स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (एसएसएलव्ही) च्या तिसर्या विकास उड्डाणात पाठवला जाईल. गगनयान मोहिमेअंतर्गत दोन मानवरहित उड्डाणेही नियोजित आहेत. मानवयुक्त अंतराळ मोहिमा पाठविण्याच्या क्षमतेची पुष्टी केली जाईल आणि वास्तविक फ्लाइट ऑर्बिट मॉड्यूलची चाचणी केली जाईल. चाचणी रॉकेटद्वारे गगनयानसाठी सब-ऑर्बिट मिशन पाठवण्याचीही योजना आहे. यासह, गगनयानच्या क्रू-एस्केप सिस्टमची चाचणी केली जाईल.