किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलमुंबई, (२४ नोव्हेंबर) – मध्य रेल्वेने ९५.४४ कि.मी.च्या वर्धा-बडनेरा विभागात रेल्वे रुळांचे विस्तारीकरण, ओव्हरहेड वायर यंत्रणेचे नियमन करणे, सिग्नल व अन्य यांत्रिकीकरणासह पायाभूत सुविधा उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सीएसएमटी-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेससह एकूण ३० गाड्या ताशी १३० किमी वेगाने धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या रेल्वे प्रवासाचा वेळेत बचत होणार आहे.
काही महिन्यापूर्वीच मध्य रेल्वेने भुसावळ विभागातील रेल्वे मार्गासह पायभूत सुविधा अद्ययावत केल्यामुळे दुरांतो एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस आणि गीतांजली एक्सप्रेससह एकूण ६७ मेल- एक्सप्रेस गाड्यांची गती वाढली आहे. आता मध्य रेल्वेने ९५.४४ कि.मी.च्या वर्धा-बडनेरा विभागात पायभूत सुविधा अद्ययावत केल्या आहे. त्यामुळे वर्धा-बडनेरा विभागात मेल-एक्सप्रेस गाड्या ताशी कि.मी. वेगाने धावणार आहे. मध्य रेल्वेने नुकताच १३० प्रति तास वेगासह स्पीड ट्रायल यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्यामुळे अप आणि डाउन मार्गावरील प्रत्येकी १५-१५ अशा ३० गाड्या वर्धा-बडनेरा ९५.४४ कि.मी. लांबीच्या १३० कि.मी. प्रतितास वेगाने चालविण्यात येत आहेत.
वाढला ३० गाड्यांचा वेग
सीएसएमटी-हजरत निजामुद्दीन-सीएसएमटी राजधानी एक्सप्रेस, सीएसएमटी-अमरावती-सीएसएमटी, सीएसएमटी-नागपूर-सीएसएमटी, हावडा-सीएसएमटी-हावडा, सीएसएमटी-गोंदिया-सीएसएमटी, सीएसएमटी-हावडा-सीएसएमटी, एलटीटी-हटिया-एलटीटी, एलटीटी-विशाखापट्टणम-एलटीटी, एलटीटी-पुरी-एलटीटी, एलटीटी-भुवनेश्वर-एलटीटी, सीएसएमटी-हावडा-सीएसएमटी गीतांजली एक्सप्रेस, सीएसएमटी-हावडा-सीएसएमटी, पुणे-संत्रागाची-पुणे, एलटीटी-कामाख्या-एलटीटी, सीएसएमटी- हावडा-सीएसएमटी दुरांतो एक्सप्रेस, गोंदिया-सीएसएमटी-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-सीएसएमटी-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस, एलटीटी-शालिमार-एलटीटी ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, एलटीटी-पुरी-एलटीटी, सीएसएमटी-हावडा-सीएसएमटी, एलटीटी- शालिमार-एलटीटी समरसता एक्स्प्रेस.