किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.71° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.71° से.
23.71°से. - 27.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलपुणे, (२४ नोव्हेंबर) – अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी होत आहे. यानिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने येत्या १ ते १५ जानेवारी या कालावधीत ‘निमंत्रण संपर्क अभियान’ राबविण्यात येणार आहे.
पौष शुक्ल द्वादशी, विक्रम संवत् २०८०, अर्थात सोमवार, २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत साकारत असलेल्या भव्य राममंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने संपूर्ण देश पुन्हा राममय व्हावा, या हेतूने विश्व हिंदू परिषदेने हे अभियान आयोजित केले आहे. याअंतर्गत देशभरातील कोट्यवधी हिंदूंशी संपर्क साधला जाईल. कोट्यवधींना प्रत्यक्ष अयोध्यत जाऊन सोहळ्यात सहभागी होणे शक्य होणार नाही, त्यामुळे आपल्याच भागात हा मंगलमय सोहळा साजरा व्हावा, या दृष्टीने हे अभियान राहणार असल्याची माहिती येथे एका पत्रपरिषदेत देण्यात आली आहे.
अभियानाचा प्रारंभ ५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत झाला. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या भव्य वास्तूच्या गर्भगृहात अक्षतांचे पूजन व अभिमंत्रण करण्यात आले. या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेच्या प्रतिनिधींकडे पूजित व अभिमंत्रित अक्षतांचे कलश सुपूर्द करण्यात आले होते. हे कलश घेऊन सर्व प्रतिनिधी आपापल्या प्रांतांत परतले आहेत. पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने सहमंत्री अॅड. सतीश गोरडे व प्रांत समरसता सहप्रमुख निखिल कुलकर्णी यांनी कलश स्वीकारला.
उपक्रमाच्या पुढच्या टप्प्यात अयोध्येतून आणलेल्या अक्षतांमध्ये भर घालून अक्षतापूजनाचा कार्यक्रम प्रत्येक प्रांतात केला जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रांतात हा कार्यक्रम येत्या रविवारी, २६ नोव्हेंबर रोजी पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती देवस्थानात आयोजिलेला आहे. महंत योगेशबुवा रामदासी, कार्यवाह, श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांच्या शुभहस्ते पूजन होऊन श्रीराम अक्षता मंगल कलश यात्रा प्रारंभ होईल. यात्रेचा समारोप कार्यक्रम आळंदी येथील ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक ह. भ. प. यशोधन साखरे महाराज यांच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर हजारो कार्यकर्ते या अक्षता व प्रभू श्रीरामचंद्रांची एक प्रतिमा घेऊन घरोघरी संपर्क साधतील. नगर व वस्तीपातळीवरील अक्षता कलशपूजन २२ डिसेंबर रोजी गीता जयंतीचे औचित्य साधून होईल व त्यानंतर घरोघरी संपर्क अभियान सुरू होईल. या अभियानात कार्यकर्ते हिंदू कुटुंबांना २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करतील. या आवाहनातून विश्व हिंदू परिषद हिंदू समाजास त्या दिवशी एकत्र येण्याची साद देणार आहेत. लोकांनी प्राणप्रतिष्ठासमयी, म्हणजेच सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत एकत्र येऊन आपले गाव, गल्ली, कॉलनीमधील कोठल्याही मंदिरात भजन-कीर्तनाचे आयोजन करावे, असे आवाहन केले जाईल. याबरोबरच शक्य असेल तेथे अयोध्येतील कार्यक्रमाचे मोठ्या पडद्यावर (एलईडी स्क्रीनवर) थेट प्रक्षेपण करावे. हिंदू भक्तिपद्धतीला अनुसरून शंखध्वनी, घंटानाद, रामनाम जप, सुंदरकांड पाठ, हनुमान चालीसा व रामरक्षास्तोत्र पठनदेखील सामूहिक पद्धतीने करावे. २२ जानेवारीला प्रत्येकाने संध्याकाळी घराबाहेर दिवा, दीपमाळा व पणत्या लावून पुनश्च दीपावली साजरी करावी, असेही आवाहन या संपर्क अभियानात करण्यात येईल.
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने १ ते १५ जानेवारी २०२४ दरम्यान गावोगावी रामकथा सप्ताह, भजन सप्ताह, कीर्तनाचे आयोजन करण्यात येणार आहे. मंदिरांचे सुशोभीकरण केले जाईल व गल्लोगल्ली भगव्या पताकांच्या माळा व घराघरांवर भगवे ध्वज लावले जातील, अशी माहितीही देण्यात आली.