किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 44 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (१२ जानेवारी) – संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन् आपल्या सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. ९ फेब्रुवारीपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.
एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे विद्यमान लोकसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे मोदी सरकारला आपला नियमित अर्थसंकल्प यावेळी सादर करता येणार नाही. त्यामुळे जून महिन्यापर्यंतचा सरकार खर्च चालविण्यासाठी सरकार अंतिरम अर्थसंकल्प सादर करणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाचा प्रारंभ होईल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाणार आहे. निवडणुकीच्या आधी शेवटचे अधिवेशन असल्यामुळे सरकार आपल्या अंतरिम अर्थसंकल्पातून युवा, महिला आणि शेतकर्यांसाठी अनेक कल्याणकारी कार्यक्रमांची घोषणा करू शकते. यावेळी पीएम सन्मान किसान निधीत दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या शेतकर्यांना दरवर्षी तीन टप्प्यात दोन हजार प्रमाणे सहा हजार रुपये मिळतात, हा सन्मान निधी १२ हजार रुपये केला जाऊ शकतो. युवा आणि महिलांसाठीही अशाच कल्याणकारी कार्यक्रमांची घोषणा केली जाऊ शकते. नवीन संसदभवनात हे अधिवेशन होणार आहे.