किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल– केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते ओडिशामध्ये उद्घाटन,
नवी दिल्ली, (२० नोव्हेंबर) – केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आज ओडिशा मध्ये ३७ पीएम श्री केंद्रीय विद्यालये आणि २६ पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयांचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर, अधिकारी वर्ग, शिक्षण तज्ञ आणि विद्यार्थी उपस्थित होते.
वर्ष २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी, देशातील शिक्षण क्षेत्राने प्रगती करण्याची गरज आहे, असे प्रधान यावेळी म्हणाले. त्यासाठी, ग्रामीण क्षेत्रातील मुलांनाही एकविसाव्या शतकातील शिक्षण देऊन, भविष्यासाठी तयार करावे लागेल, असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करताना प्रधान म्हणाले की, केवळ एक विषय म्हणून नव्हे तर मातृभाषेत इतर विषयही शिकवण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. जेव्हा मुले सुरुवातीच्या टप्प्यात त्यांच्या बोलीभाषेत शिक्षण घेतात, वाचतात आणि ऐकतात, तेव्हा त्यांची संशोधन, तर्क आणि विश्लेषण करण्याची क्षमता वाढते, असे ते म्हणाले.
पीएम श्री शाळा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करतील आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्ग तयार करणार्या आदर्श शाळा म्हणून उदयास येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या शाळांमधून २१ व्या शतकातील प्रमुख कौशल्यांनी सुसज्ज सर्वसमावेशक आणि सर्वांगीण व्यक्ती तयार होतील, असे प्रधान म्हणाले.