किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (३१ जानेवारी) – दर दिवशी शेकडो लोक फेसबुकवरील आपले प्रोफाईल डिलीट करण्याचा निर्णय घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या युझर्सना पुन्हा फेसबुककडे वळविण्यासाठी घेण्यासाठी फेसबुकने एक नवी सुविधा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या ऍपमुळे तुमच्या स्मार्टफोनमध्ये ऑनलाईन वृत्तपत्रे आणि मासिके देखील वाचता येणार आहेत. ऍपच्या प्रभावी वापराकरीता कंपनीने ‘द न्यूयॉर्क टाईम्स’, ‘द हफिंग्टन पोस्ट’, ‘युएस टुडे’ आणि ‘टाईम’ या आघाडीच्या प्रकाशनांसोबत करार केला आहे.
या ऍपची विशेषता अशी आहे की, यात बातम्या वृत्तपत्राच्या ले-आऊटशिवाय युझरच्या सुविधेनुसार बातम्या किंवा लेख वाचता येणार आहेत. फेसबुकच्या ‘क्रिएटिव्ह लॅब’ या विभागाचे हे ऍप्लिकेशन पहिलेच उत्पादन असून, येत्या ३ फेब्रुवारीपासून आयफोनवर ते उपलब्ध होणार आहे. या ऍपमुळे स्मार्टफोनच्या माध्यमातून एखादा लेख किंवा आणखी काही मजकूर वाचण्यासह त्याचे शेअरिंगही सोपे होणार आहे. मुख्य बातम्यांपासून ते अगदी क्रीडा प्रकारापर्यंत प्रत्येक विभागात विविधता राहणार आहे. फेसबुकच्या पानावर ते आपल्या ‘पर्सनल फीड’सह दिसेल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.