किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल=बंगळुरूमधील अभियंत्यांची अफाट कल्पना=
बंगळुरू, (१२ मार्च) – आयटी क्षेत्रातील भारतीय अभियंत्यांनी आपल्या अफाट प्रतिभेेने संपूर्ण जगात उत्तम कामगिरी बजावली आहे, हे सर्वच जाणतात. विशेेषत: आपल्या अभियंत्यांनी दूरसंचार, इंटरनेट आणि दळणवळणाच्या अन्य साधनांमध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणले आहेत. आता तर बंगळुरूमधील चार तरुण अभियंत्यांनी एकत्र येऊन ‘फ्री कॉल’ हा प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली असून त्यात त्यांना यश मिळाल्यास एक नवीन पैसाही खर्च न करता ग्राहकांना तासन्तास फोनवर फुकट बोलता येणार आहे. या योजनेनुसार दर दोन मिनिटाला एक जाहिरात ऐकल्यास कोणत्याही व्यक्तीला फोनवर तासन्तास बोलता येणे शक्य होईल. इंटरनेटच्या मदतीने मोफत व्हॉईस चॅटची सुविधा स्काईपसारख्या ऍप्सवर आताही उपलब्ध आहे. मात्र, नव्या सुविधेचा फायदा इंटरनेटशिवायही घेता येणार आहे. ‘ऍड व क्लाउड टेलिफोनी’ तंत्रज्ञानाचा वापर करून तसेच इंटरनेट कनेक्शन असलेल्या संगणकाला मोबाईल व लँडलाईन फोन जोडून ही ‘फ्री कॉल’ सेवा दिली जाणार आहे. हा प्रकल्प राबविणार्या कंपनीने पाच दिवसांत ६ लाख कॉल करून प्राथमिक चाचणी केली आहे. सध्या बंद असलेली ही सेवा पुढील महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती आहे.
फुकट फोन सेवा घेण्यासाठी ग्राहकाला ‘फ्री कॉल’ क्रमांकावर आधी मिस कॉल द्यावा लागेल. यानंतर कंपनीच्या सर्व्हरवरून त्याला ब्लँक कॉल येईल. त्यानंतर संबंधित व्यक्तीला ज्या नंबरवर बोलायचे असेल तो क्रमांक डायल करावा लागेल. या प्रकल्पांतर्गत दूरध्वनी ग्राहकांना एक दिवसात एक कोटी कॉलची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या माध्यमातून प्रथम वर्षी कंपनीला १८५ कोटी रुपये मिळतील, असा विश्वास कंपनीच्या संचालकांना आहे.