|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:10 पी एम
हवामान

किमान तापमान : 23.32° से.

कमाल तापमान : 23.99° से.

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 46 %

वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

23.99° से.

हवामानाचा अंदाज

22.49°से. - 25.53°से.

रविवार, 12 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.62°से. - 27.14°से.

सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल
हवामानाचा अंदाज

24.17°से. - 25.97°से.

मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

24.12°से. - 25.55°से.

बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.64°से. - 26°से.

गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.67°से. - 27.56°से.

शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल
Home » विज्ञान भारती » घरफोडीचा अलर्ट देणार ‘रोबो नंदी’

घरफोडीचा अलर्ट देणार ‘रोबो नंदी’

=ठाण्याच्या विद्यार्थ्यांचा अनोखा शोध=
ठाणे, (२१ मार्च) – आजकाल घराला कुलूप लावून बाहेर जाताना अनेकांना घरावर दरोडा पडण्याची किंवा चोरी होण्याची भीती असते. परंतु, ठाण्याच्या सहा अल्पवयीन विद्यार्थ्यांनी एका नव्या उपकरणाचा शोध लावला असून, या उपकरणामुळे घरफोड्यांपासून घरांना वाचविणे शक्य होणार आहे.
‘रोबो नंदी’ असे ठाण्याच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नव्या उपकरणाचे नाव असून, कोणीही घरात प्रवेश करण्याचा किंवा चोरीचा प्रयत्न केल्यास लगेच हे उपकरण ऍक्टिव्हेट होते आणि त्यामध्ये नोंदविण्यात मोबाईल क्रमाकांवर तसा संदेश पाठविला जातो आणि घरमालकाला अलर्ट केले जाते. असे उपकरण तयार करणार्‍या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक पुरुषोत्तम पाचपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. उपकरणात नाव असलेल्या मोबाईल क्रमाकांवर ताबडतोब संदेश जात असल्यामुळे त्यांना आपल्या शेजार्‍यांना, मित्रांना किंवा नातेवाईकांना तशी सूचना देता येईल. ठाण्यातील वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकणार्‍या सहा विद्यार्थ्यांच्या डोक्यातून ही कल्पना साकारली आहे, असे विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञानाचे प्रात्याक्षिक शिकवणार्‍या पाचपांडे यांनी सांगितले. ते येथील चिल्ड्रेन्स टेक सेंटरमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.
‘रोबो नंदी’ यामधील नंदी हे नाव पुराणांमध्ये नमूद असलेल्या भगवान शंकराच्या नंदीबैलापासून घेतले आहे, असे सांगतानाच पाचपांडे म्हणाले की, हे उपकरण लवकरच बाजारात येणार आहे आणि ते व्यावसायिक उपयोगासाठीदेखील उपलब्ध होईल. घराला कुलूप लावून कामावर जाणार्‍या किंवा बाहेरगावी जाणार्‍या लोकांना हे उपकरण खूपच फायदेशीर ठरणार असून, रोबो नंदीच्या माध्यमातून त्यांचे घर चोरांपासून सुरक्षित ठेवणे शक्य होणार आहे, असेही ते म्हणाले.
आजकाल बहुतांश गृहनिर्माण सोसायटी आणि कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असतात. परंतु, यासाठी मोठी गुंतवणूक लागते आणि सीसीटीव्ही फुटेजवर सातत्याने लक्ष ठेवावे लागते. या फुटेजमधील व्यक्तीही ओळखल्या जात नाही. शिवाय काहीतरी चोरीला गेल्यानंतर ते फुटेज तपासण्यात काय अर्थ आहे? असा सवाल करतानच पाचपांडे म्हणाले की, रोबो नंदी हे उपकरण यापेक्षा कितीतरी कमी खर्चात बसविता येते आणि चोरीचा प्रयत्न होत असतानाच कार्य करते. कोणताही आवाज न करता हे उपकरण संदेश पाठविते आणि चोरी करण्यासाठी आलेल्या चोराला याची पुसटशीही कल्पना नसते. शरद दातार, हर्षल वेलिंग, सॅनेल पाटील, व्योम व्यास, आमोद पंत आणि शौनक सावरगावकर या सहा विद्यार्थ्यांनी हे उपकरण तयार केले असून, त्यांनी नुकतेच पत्रकारांच्या उपस्थितीत त्याचे सादरीकरण केले.

Posted by : | on : 22 Mar 2014
Filed under : विज्ञान भारती
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g