Posted by वृत्तभारती
Sunday, December 3rd, 2023
नवी दिल्ली, (०३ डिसेंबर) – पाच विधानसभा निवडणुकांपैकी चार राज्यांचे निकाल हाती आले आहेत. चारपैकी तीन राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजप अनेक जागांवर आघाडीवर आहे. केवळ तेलंगणात काँग्रेस आघाडीवर आहे. या विजयानंतर भाजप नेते सातत्याने काँग्रेसवर निशाणा साधत आहेत. दरम्यान, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ते चुकून त्यांच्या...
3 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 29th, 2023
हैदराबाद, (२९ नोव्हेंबर) – विधानसभा निवडणुकीसाठी तेलंगणातील शिगेला गेलेला प्रचार मंगळवारी सायंकाळी पाच वाजता थंडावला. मघ्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोरम आणि राजस्थानच्या तुलनेत येथे प्रचारासाठी जास्त कालावधी मिळाला होता. राज्यात गुरुवारी मतदान होणार आहे. के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष सलग तिसर्यांदा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात राहील, तर काँग्रेस पक्षही जोरदार लढत देत आहे. भाजपानेही तेलंगणात सर्व शक्ती पणाला लावली आहे. तेलंगणात २,२२९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, मंत्री...
29 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 29th, 2023
नवी दिल्ली, (२९ नोव्हेंबर) – देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये मतदान झाले असून आता तेलंगणातील सर्व ११९ जागांसाठी गुरुवारी मतदान होत आहे. अशा परिस्थितीत सर्व मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी एक्झिट पोलची आतुरतेने वाट पाहत आहेत. पाच राज्यांचे निकाल ३ डिसेंबरला येणार आहेत, मात्र त्याआधी गुरुवारी तेलंगणा निवडणुकीचे मतदान संपल्याने एक्झिट पोल पाच राज्यांमध्ये कोणाचे सरकार बनणार आहे, हे दर्शवेल. मध्य प्रदेश, राजस्थान,...
29 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 21st, 2023
नवी दिल्ली, (२१ नोव्हेंबर) – केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मतदान होत असलेल्या मिझोराम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये जप्तीच्या कारवायांमध्ये लक्षणीय आणि वेगाने वाढ झाली आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून या पाच राज्यांमध्ये १७६० कोटी रुपयांहून अधिक जप्ती झाल्याची नोंद झाली आहे, जी २०१८ मध्ये या राज्यांमधील मागील विधानसभा निवडणुकीत झालेल्या जप्तीच्या (२३९.१५ कोटी रुपये) ७ पटीने अधिक आहे. पाच राज्यांमध्ये चालू असलेल्या निवडणुका आणि मागील...
21 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 15th, 2023
नवी दिल्ली, (१५ नोव्हेंबर) – छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात बुधवारी सायंकाळी ६ वाजता निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. छत्तीसगडमध्ये दुसर्या टप्प्यातील आणि मध्यप्रदेशात एकमेव टप्प्यातील मतदान शुक्रवारी होणार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यप्रदेशात जोरदार प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशात भाजपाच्या प्रचाराचे सूत्र सांभाळले होते. भाजपाच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केल्यानंतर मोदी यांनी झारखंडमध्येही जोरदार प्रचार...
15 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 7th, 2023
रायपूर, (०७ नोव्हेंबर) – काँग्रेस जेव्हा-जेव्हा सत्तेत येते, त्यावेळी अतिरेकी आणि नक्षलवाद्यांचे मनोधैर्य वाढते, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केला. ते छत्तीसगडमधील सूरजपुरातील बिश्रामपूर येथे आयोजित प्रचारसभेला संबोधित करीत होते. नक्षलवादाला रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस जेव्हाही सत्तेत येते त्यावेळी देशातील अतिरेकी आणि नक्षलवाद्यांचे मनोधैर्य वाढते. काँग्रेस सरकार नक्षलवादी हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहे. अलिकडच्या काळात भाजपाचे कित्येक कार्यकर्ते आपल्यापासून हिरावून घेण्यात...
7 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 4th, 2023
– मोदींनी साधला छत्तीसगडमध्ये काँग्रेसवर निशाणा, रायपूर, (०४ नोव्हेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी छत्तीसगडमधील दुर्ग येथे जाहीर सभेला संबोधित केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या रॅलीत त्यांनी छत्तीसगडच्या भूपेश बघेल सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, राजकीय पक्ष गरिबांमध्ये फूट पाडण्यासाठी नवनवीन कट रचत आहेत आणि जातीवादाचे विष पसरवत आहेत. कथित महादेव बेटिंग अॅप घोटाळ्यावरून त्यांनी छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आणि ते...
4 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 4th, 2023
– पैसे महादेव बॅटिंग अॅपचे, रायपूर, (०३ नोव्हेंबर) – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी (२ नोव्हेंबर) छत्तीसगडमध्ये छापा टाकून ४.९२ कोटी रुपये जप्त केले. हे पैसे महादेव बॅटिंग अॅपचे असल्याचे सांगितले जात आहे. हा संपूर्ण पैसा छत्तीसगड निवडणुकीत वापरला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एका अहवालानुसार, हे पैसे संयुक्त अरब अमिराती मधून आले होते, जे महादेव अॅपच्या प्रवर्तकाने कुरिअरद्वारे छत्तीसगडला पाठवले होते. वास्तविक, ईडीच्या पथकाला गुप्तचर माहिती मिळाली होती की विधानसभा...
4 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 2nd, 2023
नवी दिल्ली, (०१ नोव्हेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा आदी राज्यांच्या स्थापना दिनानिम्मित शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान म्हणाले, “दिवसेंदिवस विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचणारा आपला मध्यप्रदेश अमृत काळामधील देशाचे संकल्प साकारण्यात महत्त्वाचे योगदान देत आहे. हे राज्य प्रगतीच्या मार्गावर पुढे जात राहावे अशी माझी इच्छा आहे.” “मध्यप्रदेश राज्याच्या स्थापना दिनानिमित्त माझ्या मध्यप्रदेशातील सर्व लोकांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. दररोज विकासाची नवनवीन शिखरे गाठणारा आपला मध्यप्रदेश...
2 Nov 2023 / No Comment / Read More »