किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलरायपूर, (०७ नोव्हेंबर) – काँग्रेस जेव्हा-जेव्हा सत्तेत येते, त्यावेळी अतिरेकी आणि नक्षलवाद्यांचे मनोधैर्य वाढते, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केला. ते छत्तीसगडमधील सूरजपुरातील बिश्रामपूर येथे आयोजित प्रचारसभेला संबोधित करीत होते. नक्षलवादाला रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस जेव्हाही सत्तेत येते त्यावेळी देशातील अतिरेकी आणि नक्षलवाद्यांचे मनोधैर्य वाढते. काँग्रेस सरकार नक्षलवादी हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहे. अलिकडच्या काळात भाजपाचे कित्येक कार्यकर्ते आपल्यापासून हिरावून घेण्यात आले. काही दिवसांपूर्वी आपल्या एका कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
काँग्रेसच्या काळात छत्तीसगडमधील सुरगुजा परिसरात मानवी तस्करी आणि मादकपदार्थांची तस्करी वाढली आहे. गुन्हेगार आपल्या लेकी-बहिणींना लक्ष्य करीत आहेत. आदिवासी कुटुंबातील कित्येक मुली बेपत्ता झाल्या आहेत. काँग्रेसच्या नेत्यांकडे याचे उत्तर नाही. काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे सुरगुजा परिसरात सण-उत्सव साजरे करणे कठीण झाले आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती होण्यापासून काँग्रेसने द्रौपदी मुर्मू यांना रोखले होते. आदिवासी कुटुंबातून आलेली महिला राष्ट्रपती होऊ शकते, याचा विचार तुम्ही कधी केला होता का, असा प्रश्न मोदी यांनी उपस्थित केला. मुर्मू यांना रोखण्यासाठी काँग्रेसने किती प्रयत्न केले, याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. पण, भाजपाने त्यांना सन्मान दिला, असे मोदी यांनी सांगितले.