किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 23.32° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल– परवानगी नसल्याने गुन्हा दाखल,
बेंगळुरू, (०८ नोव्हेंबर) – पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ येथे मूक रॅली काढल्याबद्दल बेंगळुरू पोलिसांनी काही लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. अधिकार्यांनी बुधवारी ही माहिती दिली. एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याने सांगितले की, पॅलेस्टिनींशी एकता म्हणून सेंट मार्क रोडवर फलक आणि पोस्टर घेऊन मूक मोर्चा काढणार्या लोकांच्या गटाला निषेध करण्याची परवानगी नव्हती. ते म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फ्रीडम पार्कमध्येच निदर्शने करता येतील. या अधिकार्याने सांगितले की, मूक मिरवणुकीमुळे लोकांच्या ये-जा करण्यात अडथळे येत होते. त्यांनी सांगितले की, या संदर्भात तक्रार आल्यानंतर आंदोलकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
ऑक्टोबर २०१५ मध्ये हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला करून त्यातील १,४०० लोकांना ठार केले. या काळात त्याने इस्रायलवर चार हजारांहून अधिक रॉकेट डागले. हमासच्या दहशतवाद्यांनी २०० हून अधिक इस्रायली लोकांना ओलीस बनवले होते. इस्रायलकडून प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये गाझामध्ये आतापर्यंत १०,००० हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. इस्रायल-हमासमध्ये गेल्या एक महिन्यापासून युद्ध सुरू आहे. संपूर्ण गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. सर्वत्र अराजकता आहे. सततच्या बॉम्बहल्ल्यांमुळे गाझामध्ये मुलांच्या मृत्यूची संख्या वाढत आहे, कारण गाझा हे जगातील सर्वाधिक मुलांची लोकसंख्या असलेले शहर आहे. येथे ४७ टक्के मुले १८ वर्षाखालील आहेत.