|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.01° C

कमाल तापमान : 34.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 28 %

वायू वेग : 5.69 Mps

स्थळ : Mumbai, IN

34.99° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.08°C - 34.99°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.38°C - 31.29°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.82°C - 32.87°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.01°C - 32.87°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.9°C - 32.28°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

28.21°C - 30.5°C

sky is clear
News / Article
Author Name : - वृत्तभारती
Published by : - वृत्तभारती
Author Details : -
Email : - mail@amarpuranik.in
Facebook : -
Twitter : -

धर्माधिकारींच्या नावाने बनावट पोस्ट टाकणाऱ्याला अटक

धर्माधिकारींच्या नावाने बनावट पोस्ट टाकणाऱ्याला अटकठाणे, (२५ एप्रिल) – महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने बनावट पत्र समाज माध्यमावर पोस्ट केल्याप्रकरणी रायगड पोलिसांनी पुण्यातील २४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. धर्माधिकारी यांना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार ते परत करणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले होते. रायगड पोलिसांनी वाणिज्य पदवीधर असलेला आरोपी शुभम काळेला बनावट पत्र पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक केली. त्याला सोमवारी अलिबाग येथील न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. मुख्यमंत्री...25 Apr 2023 / No Comment /

भारतीय रेल्वेच्या सुवर्णयुगाकडे वाटचाल

भारतीय रेल्वेच्या सुवर्णयुगाकडे वाटचाल– केरळमध्ये पंतप्रधान मोदी यांचे संबोधन, – देशाच्या ताकदीचा लाभ स्थलांतरितांना, नवी दिल्ली, (२५ एप्रिल) – पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. आज मंगळवारी तिरुवनंतपुरममध्ये डिजिटल सायन्स पार्कची पायाभरणी केली. त्यांच्या दोन दिवसांच्या दौर्‍यात, पंतप्रधान मोदी केरळमध्ये ३,२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. पंतप्रधान कार्यालय नुसार, डिजिटल सायन्स पार्क ही शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने उद्योग आणि व्यावसायिक घटकांद्वारे डिजिटल उत्पादने आणि सेवा विकसित करण्यासाठी एक...25 Apr 2023 / No Comment /

मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला १४ दिवसांची पोलिस कोठडी

मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला १४ दिवसांची पोलिस कोठडी-पोलिसांना श्रीमुखात भडकावल्याचा आरोप, हैदराबाद, (२५ एप्रिल) – वायएसआर तेलंगणा पक्षाच्या नेत्या आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान एका महिला पोलिस कर्मचार्याला धक्काबुक्की करीत कानाखाली मारल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. शर्मिला यांना विशेष तपास पथकाच्या कार्यालयात जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले होते. भरती परीक्षेच्या कथित पेपर लीक प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत केली...25 Apr 2023 / No Comment /

लोकसभेची चार वर्षांत विक्रमी ८०१.४६ कोटींची बचत

लोकसभेची चार वर्षांत विक्रमी ८०१.४६ कोटींची बचत-ई-वाहनांचा वापर, पेपरलेस कार्यालय, नवी दिल्ली, (२५ एप्रिल) – लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सुरू केलेल्या ई-वाहनांचा वापर आणि पेपरलेस कार्यालय यासारख्या उपक्रमांद्वारे १७ व्या लोकसभेच्या चार वर्षांच्या कार्यकाळात विक्रमी ८०१.४६ कोटी रुपयांची बचत झाली, असे संसदेच्या एका अधिकार्याने मंगळवारी सांगितले. मे २०१९ मध्ये १७ वी लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर चार वर्षांत करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदींपैकी जवळपास एक चतुर्थांश तरतूद जतन करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने २०२१-२२ या आर्थिक वर्षात २५८.४७...25 Apr 2023 / No Comment /

मुस्लिम आरक्षण रद्द करण्याचा निर्णय तूर्तास लागू नाही

मुस्लिम आरक्षण रद्द करण्याचा निर्णय तूर्तास लागू नाही-९ मे रोजी पुढील सुनावणी, नवी दिल्ली, (२५ एप्रिल) – मुस्लिमांना असलेले चार टक्के आरक्षण रद्द करण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय ९ मे पर्यंत लागू करण्यात येऊ नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. आपले उत्तर सादर करण्यासाठी आम्हाला आणखी काही वेळ हवा, अशी विनंती राज्य सरकारने केल्यानंतर हा आदेश देण्यात आला. राज्यात मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देण्याचा पूर्वीचा निर्णय ९ मे पर्यंत कायम ठेवण्यात यावा. या तारखेला आम्ही या प्रकरणी...25 Apr 2023 / No Comment /

सुप्रीम कोर्टाने केली ललित मोदींवरील कारवाई बंद

सुप्रीम कोर्टाने केली ललित मोदींवरील कारवाई बंद-आम्ही बिनशर्त माफी मोठ्या मनाने स्वीकारतो, नवी दिल्ली, (२५ एप्रिल) – आम्ही बिनशर्त मागितलेली माफी मोठ्या मनाने स्वीकारतो. न्यायालय नेहमीच माफीवर विश्वास ठेवते. विशेषत: जेव्हा माफी बिनशर्त आणि मनापासून मागितली असेल, तर आम्ही न्यायालय अवमान प्रकरणाची कारवाई बंद करतो, असे स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयाने इंडियन प्रिमियर लीगचे (आयपीएल ) माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्यावरील अवमान कारवाई रद्द केली. ललित मोदी यांनी भारतीय न्यायव्यवस्थेविरुद्ध टिप्पणी करणारी पोस्ट समाज माध्यमांवर पोस्ट केली...25 Apr 2023 / No Comment /

सुदानमधून २७८ भारतीयांची पहिली तुकडी निघाली

सुदानमधून २७८ भारतीयांची पहिली तुकडी निघालीनवी दिल्ली, (२५ एप्रिल) – सुदानमध्ये भीषण गृहयुद्ध सुरू असताना सुदानच्या सैन्याने दुसर्‍या देशातील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्याचवेळी भारत सरकारने ऑपरेशन कावेरीच्या माध्यमातून तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे काम हाती घेतले आहे. याच क्रमाने आज ऑपरेशन कावेरी अंतर्गत अडकलेल्या भारतीयांची पहिली तुकडी सुदानमधून रवाना झाली. होय, आज खछड सुमेधा २७८ जणांसह सुदानमधील पोर्ट सुदान येथून जेद्दाहला रवाना झाली आहे. २०२३ या प्रकरणाची माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाच्या...25 Apr 2023 / No Comment /

अतिकच्या आर्थिक साम्राज्यावर पत्नीची नजर

अतिकच्या आर्थिक साम्राज्यावर पत्नीची नजर– फरार शाईस्ता ‘सीए’च्या संपर्कात, लखनौ, (२५ एप्रिल) – माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफच्या हत्येनंतर अतिकची पत्नी शाईस्ता परवीनचे लक्ष नवर्याच्या आर्थिक साम्राज्यावर आहे. शाईस्ता अतिकचे आर्थिक साम्राज्य स्वतःच्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. उत्तरप्रदेश एसटीएफला मिळालेल्या माहितीनुसार, शाईस्ता अतिकच्या नावावर असलेल्या कंपन्या आणि संपत्ती स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहे. शाईस्ता फरार आरोपी आहे. पोलिसांना चकवा देत ती अतिकशी संबंधित चार्टर्ड अकाऊंटंटच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. शाईस्ता...25 Apr 2023 / No Comment /

बिहारच्या डॉनची मुख्यमंत्र्यांकडून मुलाच्या लग्नासाठी सुटका

बिहारच्या डॉनची मुख्यमंत्र्यांकडून मुलाच्या लग्नासाठी सुटकापाटणा, (२५ एप्रिल) – बिहारमधील डॉन माजी खासदार आनंद मोहनला दलित अधिकार्याची हत्या केल्याबद्दल दोषी ठरवून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, नितीश कुमार-तेजस्वी यादव सरकारने नियमांमध्ये बदल करून खास तरतुदीद्वारे आनंद मोहनची त्याच्या मुलाच्या लग्नासाठी सुटका केली. इतकेच नाही तर, आनंद मोहनच्या मुलाच्या लग्नाला नितीश कुमार आणि तेजस्वी यादव आपल्या लव्याजम्यासह हजरही राहिले. गोपालगंजचे जिल्हा दंडाधिकारी दलित आयएएस अधिकारी जी. कृष्णय्या यांच्या हत्येबद्दल त्यावेळेचा अपक्ष खासदार आनंद मोहनला न्यायालयाने...25 Apr 2023 / No Comment /

अशी आहे, भारतातील पहिली पाण्यावर चालणारी मेट्रो

अशी आहे, भारतातील पहिली पाण्यावर चालणारी मेट्रोनवी दिल्ली, (२५ एप्रिल) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी केरळमध्ये भारतातील पहिल्या वॉटर मेट्रो रेल्वे सेवेचे उद्घाटन करणार आहेत. ट्रॅफिकच्या त्रासांपासून दूर ठेवण्या बरोबरच वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणारी ही मेट्रो सेवा शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणारी आहे. सुमारे ११३६ कोटी रुपये खर्चून कोची वॉटर मेट्रो सेवा प्रत्यक्षात साकारण्यात आली आहे. हा प्रकल्प केरळसाठी ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जात आहे. त्यातून सार्वजनिक वाहतूक तसेच शहरातील पर्यटनाच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीला आर्थिक...25 Apr 2023 / No Comment /

नितीश कुमारांची अवस्था चंद्राबाबूंसारखी होईल!

नितीश कुमारांची अवस्था चंद्राबाबूंसारखी होईल!– प्रशांत किशोर यांनी लगावला टोला!, पाटणा, (२५ एप्रिल) – जनसुराज पदयात्रेसाठी प्रशांत किशोर संपूर्ण बिहारचा दौरा करीत आहेत. यादरम्यान ते सातत्याने सर्वच पक्षांवर निशाणा साधत आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, तेजस्वी यादव हे लालूप्रसाद यादव यांचे पुत्र नसते, तर देशात अशी कोणतीही नोकरी नाही, जी त्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे मिळाली असती. नितीशकुमार आणि राजद यांचा...25 Apr 2023 / No Comment /

मोदींच्या’मन की बात’ने केली कमाल, अहवालातून मोठा खुलासा

मोदींच्या’मन की बात’ने केली कमाल, अहवालातून मोठा खुलासानवी दिल्ली, (२५ एप्रिल) – देशातील १०० कोटी जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय कार्यक्रम ’मन की बात’ एकदा तरी ऐकला आहे. तर तब्ब्ल २३ कोटी लोक नियमितपणे ’मन की बात’ ऐकतात. वास्तविक खखच् रोहतकने ’मन की बात’ वर अभ्यास केला असून हा अभ्यास प्रसार भारतीकडून कारविण्यात आला आहे. आयआयएमचे संचालक धीरज शर्मा आणि प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी यांनी सांगितले की अभ्यासासाठी डेटा संकलन हिंदी तसेच अनेक प्रादेशिक भाषांमध्ये...25 Apr 2023 / No Comment /