|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.64° C

कमाल तापमान : 29.54° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 70 %

वायू वेग : 5.22 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.54° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.51°C - 32.02°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.87°C - 32.93°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29°C - 32.52°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.78°C - 32.42°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

27.84°C - 30.17°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.21°C - 29.62°C

sky is clear

‘माझी माती, माझा देश’ अभियानातून ऐतिहासिक वारसा जोपासणार

‘माझी माती, माझा देश’ अभियानातून ऐतिहासिक वारसा जोपासणार-मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रतिपादन, मुंबई, (०९ ऑगस्ट) – देशासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग आणि बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवत आहोत. ‘माझी माती माझा देश’ अभियानातून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आपण हा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम करीत आहोत. स्वराज्याचा हुंकार या महाराष्ट्राच्या मातीतून उमटला, त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ऑगस्ट क्रांती मैदान येथे केंद्र शासनाच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ सांगतेच्या निमित्ताने ‘मेरी माटी-मेरा देश’...9 Aug 2023 / No Comment /

मुंबई मंत्रालयावर दहशतवादी हल्ल्याची धमकी

मुंबई मंत्रालयावर दहशतवादी हल्ल्याची धमकीमुंबई, (०८ ऑगस्ट) – मंत्रालयावर दहशतवादी हल्ल्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका वृद्धाला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. धमकीचे कारण समजू शकले नाही. पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सोमवारी रात्री दहा वाजता मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. यादरम्यान अज्ञात व्यक्तीने एक-दोन दिवसांत दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मुंबई पोलिसांना नुकतेच दोन कॉल आले ज्यात मुंबईत बॉम्बस्फोट झाल्याची अफवा पसरवली जात होती....8 Aug 2023 / No Comment /

मेट्रोच्या प्रस्तावाला रेल्वे मंंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

मेट्रोच्या प्रस्तावाला रेल्वे मंंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद-महत्वाचे शहर मेट्रोने जुळणार, -गोधणीच्या पुनर्विकासाचा ग्रामीण जनतेला लाभ, -केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते प्रकल्पाचा प्रारंभ, नागपूर, (०६ ऑगस्ट) – मध्यवर्ती नागपूर रेल्वेस्थानकावरुन अमरावती,बडनेरा, भंडारा, गोंदिया, वर्धा, नरखेड, काटोल,वडसा आदी ठिकाणांसाठी मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्र्यांना यापूर्वीच दिला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने आगामी काळात नागपूर येथून विदर्भातील महत्वाचे शहर जोडल्या जाणार असल्याचा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी...6 Aug 2023 / No Comment /

उबाठाचे सभागृहात अस्तित्वच नाही

उबाठाचे सभागृहात अस्तित्वच नाही– आशिष शेलार यांचा भास्कर जाधवांवर पलटवार, मुंबई, (०४ ऑगस्ट) – देशाच्या निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना कोणती, हे स्पष्ट केले असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे असा कोणताही पक्ष नोंदणीकृत नाही. शिवाय, विधानसभा अध्यक्षांनी या सभागृहात त्यांना मान्यताही दिलेली नाही. उबाठाचे या सभागृहात अस्तित्वच नसल्याने यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रश्नही उद्भवत नाही, अशा शब्दांत भाजपा नेते आशिष शेलार यांनी भास्कर जाधव यांच्यावर पर्यायाने ठाकरेंवर पलटवार केला. महाराष्ट्र माथाडी व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे...4 Aug 2023 / No Comment /

माझा टोमणे मारण्याचा स्वभाव नाही

माझा टोमणे मारण्याचा स्वभाव नाही– अजित पवारांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, मुंबई, (०४ ऑगस्ट) – काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेतेपद कोणी घ्यायला तयार नाही. वडेट्टीवारांना दोन-दोन वेळा दिले जाते. लढायच्या वेळेस तुम्ही आणि चांगले दिवस आले की, आम्ही आहोतच… अशा शब्दांत काँग्रेस नेत्यांचा समाचार घेताना, माफ करा माझा टोमणे मारण्याचा स्वभाव नाही, असे अजित पवारांनी म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला. विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर पवार बोलत होते. विरोधी पक्ष नेतेपदी कोण विराजमान होईल,...4 Aug 2023 / No Comment /

देशाला अनेक महानायक देणार्‍या महाराष्ट्राला माझे वंदन: पंतप्रधान मोदी

देशाला अनेक महानायक देणार्‍या महाराष्ट्राला माझे वंदन: पंतप्रधान मोदीपुणे, (०१ ऑगस्ट) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, देशाला अनेक महानायक देणार्‍या महाराष्ट्राच्या भूमीला मी वंदन करतो. आजचा हा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आज जितका मी उत्साहित आहे तितकाच भावूकही आहे. आज आपल्या सर्वांचे आदर्श बाळगंगाधार टिळक यांची पुण्यतिथी...1 Aug 2023 / No Comment /

उद्धव ठाकरे गटाला ‘सुप्रीम’ झटका

उद्धव ठाकरे गटाला ‘सुप्रीम’ झटका-तातडीच्या सुनावणीस नकार, नवी दिल्ली, (०१ ऑगस्ट) – एकनाथ शिंदे यांचा पक्षच खरी शिवसेना असल्याचे स्पष्ट करून या पक्षाला धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह प्रदान करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान देणार्या उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. ठाकरे गटाचे वकील अमित तिवारी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायासनापुढे आज ही याचिका सादर करताना, यावर तातडीने सुनावणी करण्यात यावी, अशी विनंती केली होती. ती...1 Aug 2023 / No Comment /

ऑगस्ट महिना कोरडाच!; हवामानाचा अंदाज

ऑगस्ट महिना कोरडाच!; हवामानाचा अंदाजमुंबई, (०१ ऑगस्ट) – ऑगस्ट महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील दोन महिने मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून मान्सूनच्या पुढील दोन महिन्यांसाठीचा अंदाज जाहीर करण्यात आला. मान्सूनमध्ये अल्-निनोचा प्रभाव वाढण्याचा अंदाज आहे. ऑगस्टचा पहिला आठवडा सोडला तर, राज्यात पाऊस कोसळण्याची शक्यता कमी आहे. मुंबई, पुण्यासह राज्यात पावसाने उसंत घेतली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे....1 Aug 2023 / No Comment /

संभाजी भिडेंचा संबंध नाही: फडणवीसांचे स्पष्टीकरण

संभाजी भिडेंचा संबंध नाही: फडणवीसांचे स्पष्टीकरणमुंबई, (३० जुलै) – महाराष्ट्राचे हिंदुत्ववादी नेते संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकतेच त्यांनी महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. काँग्रेस या संघर्षामागे भाजपचा हात असल्याचे सांगत आहे, त्यावर आता खुद्द महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, मी संभाजी भिडेंच्या व क्तव्याचा निषेध करतो. महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात त्यांच्याकडे एक...30 Jul 2023 / No Comment /

नवे शैक्षणिक धोरण लवचिक: गडकरी

नवे शैक्षणिक धोरण लवचिक: गडकरीअमरावती, (२९ जुलै) – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणले असून ते लवचिक आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिकता येईल. भारतीय भाषांमध्ये वैद्यकीय, अभियंत्रिकी शिक्षण घेता येणार आहे. जगात भारताची अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे. जागतिकीकरणाच्या युगात रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी नवीन अभ्यासक्रमांची सुरवात करण्यात येत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गडकरी पुढे म्हणाले, शंभर वर्षांची मोठी परंपरा...29 Jul 2023 / No Comment /

विरोधक गतीरोधकाचे काम करताहेत: सुधीर मुनगंटीवार

विरोधक गतीरोधकाचे काम करताहेत: सुधीर मुनगंटीवारमुंबई, (२९ जुलै) – मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांच्या हितासाठी कल्याणकारी योजना घोषित केल्यानंतर, निर्णय घोषित झाल्यानंतर अभिनंदन करणे तर सोडा, उलट गतीरोधक होऊन योजना शेतकर्यांपर्यंत पोहोचू नये, असा प्रयत्न असल्याचा भाव ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्यातून दिसत आहे. थोरातांनी ज्याप्रमाणे वक्तव्य केले, त्याचा निषेधच सभागृहाने केला पाहिजे. अशा शब्दांत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकर्यांना भरपाई देण्यासंदर्भात निवेदन केले....29 Jul 2023 / No Comment /

संभाजी भिडेंना अटक करा!: पृथ्वीराज चव्हाण

संभाजी भिडेंना अटक करा!: पृथ्वीराज चव्हाणमुंबई, (२८ जुलै) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी विधानसभेत महात्मा गांधींविरोधात केलेल्या वक्तव्यावरून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली. चव्हाण म्हणाले, अमरावती येथील संभाजी भिडे नावाच्या व्यक्तीने राष्ट्रपिता यांच्या विरोधात निर्लज्ज आणि अवमानकारक वक्तव्य केल्याने समाजात द्वेष पसरेल. ते म्हणाले, या व्यक्तीला तात्काळ अटक करण्यात यावी. राष्ट्रपिताविषयी अपमानास्पद वक्तव्य करून तो मोकळा कसा फिरू शकतो?. विधानसभेत गदारोळ झाल्यानंतर सभापती...28 Jul 2023 / No Comment /