|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:53 | सूर्यास्त : 18:53
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.63° C

कमाल तापमान : 31.99° C

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 74 %

वायू वेग : 4.02 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.99° C

Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.4°C - 31.99°C

overcast clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.69°C - 30.3°C

overcast clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.51°C - 29.75°C

few clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.53°C - 29.82°C

scattered clouds
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.5°C - 30.16°C

light rain
Weather Forecast for
Monday, 27 May

28.46°C - 30.14°C

light rain

विमानानंतर आता बसमध्येही लाजिरवाणी घटना

विमानानंतर आता बसमध्येही लाजिरवाणी घटनाकर्नाटक, (२३ फेब्रुवारी ) – विमानानंतर आता बसमधील एका तरुणाने लाजिरवाणी घटना केली आहे. विजयपुराहून मंगळुरूला जाणारी बस रात्री हुबळीजवळ थांबली असताना एका ३२ वर्षीय व्यक्तीने एका महिला सहप्रवाशाच्या सीटवर लघवी केली. बस क्रमांक केए-१९एफ-३५५४ आहे जी विजयपुराहून मंगळुरूला जात होती. यापूर्वी गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला न्यूयॉर्क-नवी दिल्ली एअर इंडियाच्या विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये एका पुरुष प्रवाशाने महिला सहप्रवाशावर लघवी केल्याचा आरोप केला होता. आता अशीच घटना एका बसमध्ये घडली आहे....23 Feb 2023 / No Comment /

कर्नाटकमध्ये बांधले जाईल भव्य राम मंदिर: बोम्मई

कर्नाटकमध्ये बांधले जाईल भव्य राम मंदिर: बोम्मईबंगळुरू, (१७ फेब्रुवारी ) – कर्नाटक विधानसभेत शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. सीएम बसवराज बोम्मई यांचा चालू कार्यकाळातील त्यांच्या सरकारचा हा दुसरा आणि शेवटचा अर्थसंकल्प असेल. सीएम बोम्मई यांनी एप्रिल-मे मध्ये प्रस्तावित विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याणकारी योजना आणि अनेक प्रमुख समुदायांच्या मागण्या पूर्ण करणे यासारख्या काही मोठ्या घोषणा करणे अपेक्षित आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राम मंदिर उभारणीची घोषणा केली...17 Feb 2023 / No Comment /

काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची लोकायुक्तांकडून चौकशी : बोम्मई

काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची लोकायुक्तांकडून चौकशी : बोम्मई-विरोधी आणि सत्ताधार्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप, बंगळुरू, (१५ फेब्रुवारी ) – राज्यात काँग्रेस पक्षावर ६० पेक्षा अधिक प्रकरणांत भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. सध्या लोकायुक्तांकडून त्याची चौकशी सुरू आहे, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला आहे. कर्नाटकात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्यावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसने भाजपा सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप लावल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांच्यावर जोरदार टीका चालवली आहे. काँग्रेस आणि करप्शन या दोन्ही इंग्रजी शब्दांची सुरुवात ‘सी’ या...15 Feb 2023 / No Comment /

शिवकुमारांजवळ १२० लोकांचे अश्लील छायाचित्रण

शिवकुमारांजवळ १२० लोकांचे अश्लील छायाचित्रण-भाजपा आमदाराचा गंभीर आरोप, बंगळुरू, (३० जानेवारी) – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्याजवळ स्वपक्षातील नेत्यांसह १२० लोकांचे अश्लील छायाचित्रण असल्याचा गंभीर आरोप भाजपाचे आमदार रमेश जारकीहोली यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. काँग्रेस नेते शिवकुमार यांच्याजवळ काँग्रेस नेत्यांसह राज्यातील वरिष्ठ नेते आणि अधिकार्यांचे अश्लील छायाचित्रण आहेत. याद्वारे त्यांच्याकडून ब्लॅकमेलिंग करण्यात येत आहे. काही काँग्रेस नेते, वरिष्ठ अधिकार्यांसह अन्य लोक त्यांच्या अश्लीलतेच्या जाळ्यात (हनी...30 Jan 2023 / No Comment /

कर्नाटकच्या सीमाक्षेत्रात तपासणी वाढवली

कर्नाटकच्या सीमाक्षेत्रात तपासणी वाढवलीबंगळुरू, ३ जानेवारी – देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच कर्नाटक सरकारने राज्याच्या सीमेवरील तपासणी वाढवली आहे. विशेषत: महाराष्ट्राच्या सीमेवर अधिक काळजी घेण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. मागील आठवड्यात देशभरात कोरोना आणि ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील बाधितांची संख्या सातत्याने वाढ आहे. त्यामुळे महाराष्ट्राला लागून असलेल्या शहरांच्या सीमांवर कडक दक्षता ठेवण्याच्या सूचना कर्नाटक सरकारने दिल्या आहेत. कोरोना लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या तसेच आरटी-पीसीआर चाचणीचा...3 Jan 2022 / No Comment /

पुनीत राजकुमारच्या जीवनावर चित्रपट येणार

पुनीत राजकुमारच्या जीवनावर चित्रपट येणारबंगळुरू, २३ नोव्हेंबर – हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेले कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांच्यासोबत ‘युवारथना’ या सुपरहिट चित्रपटात काम करणारे निर्माते संतोष आनंदराम यांनी पुनीत यांच्यावर बायोपिक काढणार असल्याचे संकेत दिले आहेत. संतोष यांना समाजमाध्यमावर एका चाहत्याने पुनीत यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याची विनंती केली होती. त्या चाहत्याला उत्तर देत त्यांनी पुनीतचा बायोपिक पडद्यावर आणण्यासाठी मी माझ्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करेन, असे म्हटले आहे....23 Nov 2021 / No Comment /

कर्नाटकात पावसाचे थैमान सुरूच, २४ जणांचा मृत्यू

कर्नाटकात पावसाचे थैमान सुरूच, २४ जणांचा मृत्यूबंगळुरू, २२ नोव्हेंबर – अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे दक्षिण भारतात पावसाने थैमान घातले आहे. चार दिवसांपासून कर्नाटकात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, हजारो लोक बेघर झाले आहेत. मुसळधार कोसळणार्‍या पावसामुळे कर्नाटकात आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला असल्याची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात संततधार पाऊस सुरू आहे. रस्त्यांसोबत शेतातही पाणी झाले असून, मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होऊन जवळपास पाच लाख हेक्टर जमिनीवरील पिके...22 Nov 2021 / No Comment /

मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव कित्तूर कर्नाटक करणार

मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव कित्तूर कर्नाटक करणारमुख्यमंत्री बोम्मई यांची घोषणा, बंगळुरू, २ नोव्हेंबर – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून कित्तूर कर्नाटक प्रदेश ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले की, मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून कित्तूर कर्नाटक प्रदेश केले जाईल. वारंवार सीमा वाद निर्माण होत असताना जुने नाव ठेवण्यात अर्थ नाही, त्यामुळे या भागाचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याच्या ६५व्या स्थापना दिनानिमित्त असलेल्या कर्नाटक राज्योत्सवादरम्यान बोम्मई यांनी ही घोषणा केली. हैदराबाद-कर्नाटक...2 Nov 2021 / No Comment /

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे निधन

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे निधनबंगळुरू, २९ ऑक्टोबर – कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचे आज शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते. कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे कन्नड सिनेसृष्टीवर आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. पुनीत यांना शुक्रवारी दुपारी एक ते दीडच्या दरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना तातडीने बंगळुरूतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते....30 Oct 2021 / No Comment /

आता कर्नाटक कॉंग्रेसमध्ये वादळ

आता कर्नाटक कॉंग्रेसमध्ये वादळनेत्यांच्या कुजबुजीच्या व्हायरल व्हिडीओने खळबळ, बंगळुरू, १४ ऑक्टोबर – पंजाब आणि छत्तीसगडमधील अंतर्गत गटबाजीने कॉंग्रेस हायकमांडची चांगलीच दमछाक झाली. आता कर्नाटक कॉंग्रेसमधील सुंदोपसुंदी एका व्हायरल व्हिडीओमुळे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कर्नाटक कॉंग्रेसचे माध्यम समन्वयक एम. ए. सलीम आणि वरिष्ठ नेते व्ही. एस. उग्रप्पा यांच्यातील चर्चेचा एक कथित व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. यामुळे राज्यातील सत्ताधारी भाजपाला टीका करण्याची आयती संधी मिळाली. हा व्हिडीओ कर्नाटक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार...14 Oct 2021 / No Comment /

२० हजार हिंदूंना बनविले ख्रिश्‍चन, आईचेही केले धर्मांतर

२० हजार हिंदूंना बनविले ख्रिश्‍चन, आईचेही केले धर्मांतरकर्नाटक विधानसभेत आमदाराने केला मिशनर्‍यांचा पर्दाफाश, बंगळुरू, २२ सप्टेंबर – कर्नाटक विधानसभेत मंगळवारी हिंदूंना ख्रिश्‍चन बनविण्याचा मुद्दा जोरकसपणे उपस्थित झाला. भाजपाचे आमदार गुलीहट्टी शेखर यांनी या मुद्याकडे सभागृहाचे लक्ष वेधताना, ख्रिश्‍चनांनी आतापर्यंत २० हजारांवर लोकांचे बळजबरीने धर्मांतर केले असल्याचा आरोप केला. ख्रिश्‍चन मिशनर्‍यांकडून हिंदूंचे धर्मांतरण करण्याची व्यापक मोहीमच सुरू आहे. या मिशनर्‍यांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. जे लोक धर्मांतराचा विरोध करतात, त्यांना खोट्या आरोपांमध्ये अडकविले जाते...22 Sep 2021 / No Comment /

बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री; आज शपथविधी

बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री; आज शपथविधीबंगळुरू, २७ जुलै – भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज मंगळवारी झालेल्या बैठकीत कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई यांची एकमताने निवड करण्यात आली. उद्या बुधवारी सकाळी अकरा वाजता ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. केंद्रीय निरीक्षक म्हणून या बैठकीत केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी आणि धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. बैठकीपूर्वी दोन्ही निरीक्षकांनी सर्व आमदारांच्या वेगवेगळ्या बैठका घेऊन त्यांचे मत जाणून घेतले. यानंतर येदीयुरप्पा आणि दोन्ही केंद्रीय निरीक्षक बैठक सुरू असलेल्या हॉटेलमध्ये आले....27 Jul 2021 / No Comment /