किमान तापमान : 26.07° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 44 %
वायू वेग : 1.53 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
25.45°से. - 28.72°से.
शनिवार, 08 फेब्रुवारी साफ आकाश25.28°से. - 28.37°से.
रविवार, 09 फेब्रुवारी साफ आकाश25.39°से. - 28.04°से.
सोमवार, 10 फेब्रुवारी साफ आकाश25.32°से. - 27.59°से.
मंगळवार, 11 फेब्रुवारी कुछ बादल25.12°से. - 27.28°से.
बुधवार, 12 फेब्रुवारी साफ आकाश24.61°से. - 27.47°से.
गुरुवार, 13 फेब्रुवारी साफ आकाशनवी दिल्ली, २ नोव्हेंबर – उत्तरप्रदेशातील राज्यसभेच्या १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने आठ तर सपा आणि बसपा यांना प्रत्येकी एक जागा मिळाली. भाजपाच्या विजयी उमेदवारांत केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री हरदीपसिंग पुरी, भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुणसिंह, माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र नीरजशेखर, माजी पोलिस महासंचालक ब्रिजलाल, बी. एल. शर्मा, हरिद्वार दुबे, गीता शाक्य आणि सीमा द्विवेदी यांचा समावेश आहे. समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव तर बसपाचे रामजित गौतमही वरिष्ठ सभागृहात पोहोचले.
राज्यसभेच्या दहा जागांसाठी अकरा अर्ज दाखल झाले होते. मात्र प्रकाश बजाज यांचा अर्ज खारिज झाल्यामुळे राज्यसभेचे दहा उमेदवार अविरोध विजयी झाले. उत्तरप्रदेशात राज्यसभेच्या एकूण ३१ जागा असून, यातील २२ जागा भाजपाकडे आहेत. सपाकडे पाच, बसपाकडे तीन तर कॉंग्रेसकडे फक्त एक जागा आता उरली आहे. भाजपाचे ३ सदस्य निवृत्त झाले होते, पण भाजपाचे आठ सदस्य विजयी झाल्यामुळे भाजपाचा पाच जागांचा फायदा झाला. राज्यसभेतील भाजपाचे संख्याबळ ९२ वर पोहोचले असून कॉंग्रेसकडे ३८ खासदार राहिले आहेत.