किमान तापमान : 29.17° से.
कमाल तापमान : 31.05° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.05° से.
27.34°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– गुरुद्वारातील शीख समुदायाने केले संरक्षण,
न्यू यॉर्क, (२८ नोव्हेंबर) – गुरुपुरब पर्वासाठी न्यू यॉर्कच्या लाँग आयलॅण्ड येथील गुरुद्वारात गेलेले अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजितसिंग यांच्यासोबत खलिस्तान्यांनी दुर्व्यवहार केला. मात्र, गुरुद्वारातील शीख समुदायाने त्यांना संरक्षण देत बाहेर काढले. खलिस्तान्यांसोबत झालेल्या वादाची चित्रफीत समाज माध्यमावर व्हायरल झाली आहे. या चित्रफितीत संधू खलिस्तान्यांसोबत भिडलेले दिसून आले. खलिस्तानी अतिरेकी निज्जरची कॅनडात हत्या झाल्यानंतर अमेरिका आणि कॅनडातील खलिस्तानी आक्रमक झाले आहेत. भारताच्या राजदूतांचे वाहन गुरुद्वारा परिसरातून बाहेर पडताना दिसत आहे. त्यावेळी एक खलिस्तानी गुरुद्वाराच्या बाहेर खलिस्तानचा झेंडा फडकावताना दिसत आहे.
तरणजितसिंग संधू यांनी गुरू नानक दरबारचा दौरा केला. येथे आयोजित कार्यक‘मात ते सहभागी झाले. आज गुरुपर्वासाठी लाँग आयलॅण्डमधील गुरू नानक दरबारात अफगाणिस्तानसह स्थानिक संगतसोबत सहभागी होण्याचे भाग्य लाभले. या दरम्यान कीर्तन ऐकले. गुरू नानक यांनी एकजूटता, ऐक्य आणि समानतेचा संदेश दिला. गुरू पर्वाला लंगरचा आस्वादही घेतला आणि सर्वांसाठी आशीर्वाद मागितला, असे संधू यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. कॅनडा, ब्रिटेन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसह कित्येक परिसरांमध्ये खलिस्तान्यांकडून हिंसाचाराची प्रकरणे वाढत आहेत. यापूर्वी खलिस्तान्यांनी सॅन फ्रॅन्सिस्कोयेथे भारतीय वाणिज्य दूतावासात जाळपोळ केली होती.