किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– यापूर्वीही गैर-मुस्लिमांविरोधात अशा प्रकारच्या मोहिमा,
सिंध, (२७ नोव्हेंबर) – सिंधमधील हिंगलाज मातेचे मंदिर पाडण्यात आल्याने पाकिस्तानातील हिंदूंच्या स्थितीचा अंदाज येतो. न्यायालयाच्या आदेशानंतर हिंदू मंदिर पाडण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी तेथे उपस्थित हिंदू समाजाने जोरदार घोषणाबाजी करत मंदिर पाडल्याचा तीव्र निषेध केला. पाकिस्तानात यापूर्वीही गैर-मुस्लिमांविरोधात अशा प्रकारच्या मोहिमा होत आहेत. त्याचबरोबर हिंदू आणि शीख समाजाच्या धार्मिक स्थळांवर होणार्या हल्ल्यांच्या घटनांवर पाकिस्तान सरकारकडून कोणतेही ठोस निर्णय घेतले जात नाहीत. सरकार मूक प्रेक्षक राहिले आहे. यामुळे हिंदूंच्या तसेच शीख धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या जातात.
ताज्या प्रकरणात पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा मानवाधिकार उल्लंघनाचे प्रकरण समोर आले आहे. पाकिस्तानमधील अधिकार्यांनी एका हिंदू मंदिराला लक्ष्य केल्याची माहिती आहे. याअंतर्गत न्यायालयाच्या आदेशानंतर सिंध प्रांतातील हिंगलाज माता मंदिर पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे. मिठी शहरातील मंदिर पाडण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत थारपारकर जिल्हा अधिकार्यांनी सांगितले. मिठी शहर हे पाकिस्तानातील हिंदूबहुल क्षेत्र आहे. येथे मोठ्या संख्येने हिंदू समाजाचे लोक राहतात. हिंदूबहुल मिठी शहर पाहण्यासाठी संपूर्ण पाकिस्तानातून लोक येतात.
एका वृत्तानुसार, एलओसी म्हणजेच नियंत्रण रेषेजवळ हिंदूंचे आणखी एक धार्मिक स्थळ शारदा पीठ मंदिर पाडण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या संरक्षण आदेशानंतरही हे मंदिर पाडण्यात आले. मंदिराजवळ एक कॉफी हाऊस बांधले जात असून, त्याचे उद्घाटन यावर्षी होणार आहे. पाकिस्तानात हिंदूंवर होणारे अत्याचार ही काही नवीन घटना नाही. येथे राहणार्या हिंदूंना सतत आव्हानांचा सामना करावा लागतो. अहवालानुसार, युनेस्कोची जागा असूनही शारदा पीठ पाडण्यापासून वाचलेले नाही. या विध्वंसामुळे पाकिस्तानमधील सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाच्या संरक्षणावर प्रश्न निर्माण होतात. यापूर्वी जुलैमध्येही एक मंदिर पाडण्यात आले होते. कराचीतील मरीमातेचे मंदिर जमीनदोस्त करण्यात आले. संपूर्ण परिसरात लाईट नसताना मंदिर पाडण्यात आले. बाहेरील भिंत आणि गेट वगळता संपूर्ण अंतर्गत रचना पाडण्यात आली.