किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– हिमखंड सरकल्याने समुद्री जीवसृष्टीला धोका,
लंडन, (२७ नोव्हेंबर) – जगातील सर्वांत मोठे हिमखंड तुटून ते दक्षिणी महासागराकडे सरकण्यास सुरुवात झाल्यानंतर अंटार्क्टिकामधील सील, पेंग्विन व समुद्री पक्ष्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. ‘ए२३ए’ असे या हिमखंडाचे नाव आहे. सध्या तो उत्तरेकडे म्हणजे दक्षिण आफिके च्य दिशेने सरकत असल्याचे चित्र आहे.
तज्ज्ञांच्या मते, ३० वर्षांनंतर प्रथमच असे झाले आहे की, जगातील सर्वांत मोठा हिमखंड आपल्या जागेवरून सरकला आहे. हा हिमखंड चक्क चार हजार चौरस किमी अंतरात विस्तारलेला आहे. हा हिमखंड न्यू यॉर्क शहराच्या तुलनेत तीन पटीने मोठा आहे. ‘ए२३ए’ हा जगातील सर्वांत जुन्या हिमखंडापैकी एक मानला जातो. १९८६ मध्ये पश्चिम अंटार्क्टिकातील फिल्चर-रोन आईस शेल्फपासून अलग झाल्यानंतर वेडेल अडकल्याने एकही हिमखंड पुढे सरकू शकला नव्हता. आता सॅटेलाईट छायाचित्राच्या माध्यमातून असे स्पष्ट झाले आहे की, जवळपास एक ट्रिलियन वजनाचा हा हिमखंड प्रचंड वारा व धारांमुळे उत्तरेकडे कूच करॅत आहे.
बि‘टिश अंटार्क्टिका सर्व्हेचे ग्लेशिओलॉजिस्ट ओलिव्हर मार्श यांनी अशा प्रकारचा हिमखंड सरकताना पाहणे अतिशय दुर्मीळ असल्याचे सांगितले. ऑलिव्हर यांच्या मते, हा हिमखंड सध्या बराच पातळ झाला आहे आणि त्यामुळे त्यात हालचाली दिसून येत आहे. याचमुळे समुद्रातून तो पुढे सरकणे शक्य होते आहे. ‘ए२३ए’ हा हिमखंड आता दक्षिण जॉर्जिया बेटावर जमीनदोस्त होऊ शकेल, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, असे झाल्यास अंटार्क्टिकावरील वन्य जीवांसाठी हा फार मोठा धोका आहे. यावर असलेले लाखो सील, पेंग्विन व समुद्री पक्षी येथेच प्रजनन करतात आणि आसपासच्या पाण्यात आहार घेतात.
यापूर्वी २०२० मध्येही असाच एक विशाल हिमखंड ‘ए ६८’ने अशी शक्यता निर्माण केली होती. तो हिमखंड दक्षिण जॉर्जियाला टक्कर देईल आणि तेथील समुद्र पटलावरील जीवसृष्टी नष्ट होण्याची भीती होती. मात्र, त्यावेळी तो छोट्या छोट्या तुकड्यात विभागला गेल्याने फार हानी झाली नाही. आता ‘ए२३ए’ बद्दलही तीच पुनरावृत्ती व्हावी, अशी तज्ज्ञांची अपेक्षा आहे.