किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 31° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31° से.
27.43°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– जपानमध्ये उभारला प्रकल्प,
टोकियो, (०६ डिसेंबर) – जगाच्या विकसित देशांमध्ये न्यूक्लिअर रिअॅक्टरच्या माध्यमातून वीजनिर्मितीचे काम अनेक दशकांपासून सुरू आहे. आता जपानच्या नाका नॉर्थमध्ये जगातील सर्वांत मोठ्या न्यूक्लिअर प्लान्टने काम सुरू केले आहे. या अणुऊर्जा प्रकल्पात न्यूक्लिअर फ्युजनमधून सूर्याइतकी ऊर्जा निर्माण केली जाऊ शकते. नाका नॉर्थमध्ये स्थापित या न्यूक्लिअर रिअॅक्टरचे नाव ‘जेटी ६० एसओ’ असे असून, त्यामधून सूर्यासारखी ऊर्जा निर्माण केली जात आहे. त्याचे जगातील अन्य प्रकल्पांपेक्षा काय वेगळेपण आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
आतापर्यंत जितके न्यूक्लिअर रिअॅक्टर काम करीत आहेत, ते ‘न्यूक्लिअर फिजन’वर आधारित आहेत. त्याचा अर्थ असा आहे की, तिथे अणूच्या विखंडनातून ऊर्जा निर्माण केली जाते. मात्र, ‘जेटी ६० एसओ’ हे ‘न्यूक्लिअर फ्युजन’वर काम करते. त्याचा अर्थ असा की, हायड्रोजनच्या दोन अणुंना जोडून ऊर्जा निर्माण केली जाते. तिथे अद्याप व्यावसायिकरीत्या ऊर्जानिर्मिती केली जात नाही. मात्र, या प्रयोगात यश मिळाले तर कार्बन मुक्त ऊर्जा मिळवण्यासाठी हा एक महत्त्वाचा स्रोत ठरू शकतो. त्यामुळे प्रदूषणालाही लगाम बसेल व जगाची ऊर्जेची गरजही भागेल.
फ्युजन रिअॅक्टरची वैशिष्ट्ये
– हे रिअॅक्टर सुमारे सहा मजली उंच
– डोनट या खाद्यपदार्थाच्या (आपल्याकडील मेदुवड्यासारख्या) आकारात बनवलेले
– उपकरणाला ‘टोकामाक’ नाव दिले आहे
– टोकामाकच्या आत प्लाझ्मा फिरवला जातो
– प्लाझ्मा वेगाने फिरल्यावर तापमानाचा स्तर २ कोटी अंशांवर जातो
– जगभरातील ५०० अभियंते या प्रकल्पात सहभागी