किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.93° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.93° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– भूकंपाची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल,
– भारत आणि तिबेटमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले,
काठमांडू, (०४ नोव्हेंबर) – नेपाळच्या नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११.४७ वाजता नेपाळमध्ये भूकंपाचा धक्का बसला आणि त्याचा केंद्रबिंदू जाजरकोटमध्ये जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाचे झटके इतके भयनाक होते की भारत आणि तिबेटमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहे.
पश्चिम नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामुळे आतापर्यंत १२८ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. भूकंपामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. नेपाळच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की रुकुम पश्चिममध्ये ३५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जाजरकोट जिल्ह्यात ९० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भूकंप झाल्यापासून बचाव दल बचाव कार्यात गुंतले आहे. शुक्रवारी रात्री ११.३० च्या सुमारास नेपाळच्या पश्चिम भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ इतकी मोजण्यात आली आहे. त्याचवेळी पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रभावित भागाचा दौरा करण्यासाठी रवाना झाले आहेत.
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. नेपाळच्या पीएमओने ट्विट केले, पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी शुक्रवारी रात्री ११.४७ वाजता जाजरकोटच्या रामीदांडा येथे झालेल्या भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि घरांच्या हानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. जखमींना तात्काळ बचाव आणि मदतीसाठी तिन्ही सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. हिमालयीन देश नेपाळमध्ये भूकंप सामान्य आहेत. २०१५ मध्ये, ७.८ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने संपूर्ण देश हादरला, १२,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि हजारो घरे उद्ध्वस्त झाली.