किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल– ग्लोबल टाईम्सने मोदी सरकारवर उधळली स्तुतिसुमने,
बीजिंग, (०४ जानेवारी) – भारताच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणाची ताकद चीनने आता ओळखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणात सकारात्मक बदल झाला, अशी स्तुतिसुमने चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने लिहिलेल्या एका लेखात उधळली आहेत.
धोरणात्मकदृष्ट्या भारतात आता मोठा विश्वास निर्माण झाला आहे आणि आपले नॅरेटिव्ह विकसित करण्यासाठी अधिक सक्रियतेने काम करीत असल्याचे या लेखात म्हटले आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भारताच्या आर्थिक, सामाजिक प्रशासन आणि परराष्ट्र धोरणाची या लेखात स्तुती कर्यात आली आहे. ग्लोबल टाईम्स हे सरकारी वृत्तपत्र असल्याने त्यात प्रकाशित लेख हे चीन सरकारचे विचार मानले जातात. हा लेख शांघायमधील फुदान विद्यापीठातील दक्षिण आशिया विभागाचे तज्ज्ञ झांग जियादोंग यांनी लिहिला आहे. मागील चार वर्षांत भारताने मिळवलेल्या यशांची माहिती यात दिली आहे.
या लेखात भारताची मजबूत आर्थिक वाढ, शहरी प्रशासनातील सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय संबंध, विशेषतः चीनप्रती भारताच्या दृष्टिकोनाबद्दल उल्लेख करण्यात आला. ज्यावेळी भारत आणि चीनमधील व्यापारी तुटीवर चर्चा व्हायची, त्यावेळी भारतीय प्रतिनिधींचे लक्ष ही तूट दूर करण्यासाठी चीनने उचललेल्या पावलांवर असायचे. मात्र, आता भारतीय प्रतिनिधी भारताची निर्यात क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करीत आहेत. वेगाने होणारा आर्थिक आणि सामाजिक विकासामुळे भारत आता पूर्वीच्या तुलनेत जास्त धोरणात्मकदृष्ट्या आत्मविश्वासाने भरलेला आहे, असे या लेखात म्हटले आहे.
भारताचे काम विश्वगुरूप्रमाणे
आता राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या भारताचा जोर लोकशाहीवर जास्त आहे, असे २ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या या लेखात म्हटले आहे. भारत आता वसाहतवादी युगाच्या सावलीपासून दूर जात आहे आणि विश्वगुरूप्रमाणे काम करीत आहे. कित्येक देशांसोबत संतुलित संबंध ठेवून भारत पुढे जात आहे. एकीकडे अमेरिका, जपान आणि रशियासोबत संबंध बळकट करीत आहे, तर दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धातही भारताने उत्कृष्ट धोरणा दाखवले. भारत आज ध्रुवीय जगात एक मजबूत पक्ष म्हणून उदयास येत आहे.