किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलवॉशिंग्टन, (१० नोव्हेंबर) – भारत हा अमेरिकेचा धोरणात्मक भागीदार आहे. मध्य पूर्वेसह जगभरातील कोणत्याही विशिष्ट संकटावर कींवा आकस्मिक परिस्थितीवर आपली भूमिका ठरवण्यास तो स्वतंत्र आहे, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. व्हाईट हाऊसमधील नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलमधील स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्सचे समन्वयक जॉन किर्बी यांनी हे मत मांडले आहे.
भारताचे इस्रायलशी चांगले संबंध असल्याने मध्य पूर्वेतील संकट सोडवण्यासाठी अमेरिका भारताच्या भूमिकेला कोणत्या दृष्टीने पाहते, या प्रश्नाला ते उत्तर देत होते बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जून महिन्यातील अमेरिका दौ-याचा संदर्भ देत सांगितले की, भारत हा एक महत्त्वाचा सामरिक भागीदार आहे आणि मला वाटते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जून महिन्यात येथे होते तेव्हा तुम्ही हे अनुभवले आहे.
परंतु, मध्य पूर्वेचा समावेश करण्यासाठी जगभरातील कोणत्याही विशिष्ट संकटावर कींवा आपत्कालीन परिस्थितीवर त्यांची भूमिका काय असेल हे ठरवण्यासाठी आम्ही ते भारत सरकार आणि पंतप्रधानांवर सोडू, असे किर्बी म्हणाले. भारताने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलच्या शहरांवर हमासच्या हल्ल्याचे वर्णन दहशतवादी हल्ले म्हणून केले होते, परंतु त्याच वेळी इस्रायलच्या प्रत्युत्तराच्या पृष्ठभूमीवर गाझामधील नागरिकांच्या मृत्यूच्या चिंतेमुळे आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे कठोर पालन करण्याचे आवाहन केले होते.