किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 31° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31° से.
27.43°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– संयुक्त राष्ट्रांच्या नेत्यांचे गौरवोद्गार,
संयुक्त राष्ट्र, (३० नोव्हेंबर) – संयुक्त राष्ट्रांच्या सर्वोच्च नेत्यांनी आणि राजदूतांनी जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि दक्षिण-दक्षिण सहकार्याला चालना देण्यासाठी भारताच्या ‘अनुकरणीय नेतृत्वाची’ प्रशंसा केली आहे. त्यांनी देशाचे जी-२० अध्यक्षपद तसेच भारत आणि संयुक्त राष्ट्र यांच्यातील मजबूत भागीदारीवर प्रकाश टाकला. भारताने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका वर्षासाठी जी-२० चे अध्यक्षपद स्वीकारले आणि आता ते ब्राझीलकडे सोपवणार आहे.
संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी मिशन आणि दक्षिण-दक्षिण सहकार्यासाठी संयुक्त राष्ट्र कार्यालयाने बुधवारी येथे संयुक्त राष्ट्रांंच्या मुख्यालयात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भारत-युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट पार्टनरशिप फंड सहयोगी भागीदारीला सहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना संयुक्त राष्ट्राच्या उपमहासचिव अमीना मोहम्मद म्हणाल्या, भारत दीर्घकाळापासून दक्षिण-दक्षिण सहकार्याचा पुरस्कर्ता आहे आणि शाश्वत विकास उद्दिष्टांचा जागतिक पाठपुरावा करत आहे आणि वसुधैव कुटुम्बकम् या तत्त्वाचा वापर करीत आहे. खपवळर भारत-युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट पार्टनरशिप फंड हा एक शाश्वत, न्याय्य आणि सर्वोत्तम जग निर्माण करण्यासाठी, सीमा आणि मतभेद ओलांडून देश एकत्र येऊन मिळवू शकणार्या असामान्य कामगिरीचा पुरावा आहे, असे गौरवोद्गार अमीना मोहम्मद यांनी काढले. भागीदारी निधीचा सहावा वर्धापन दिन आपल्याला शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनेक अडथळे आणि या आव्हानांवर मात करण्यासाठी दक्षिण-दक्षिण सहकार्याची महत्त्वाची भूमिका यावर विचार करण्यास प्रवृत्त करते, असेही त्यांनी सांगितले. फंडाची स्थापना २०१७ मध्ये झाली होती आणि त्यानंतर ५४ देशांमधील ७६ प्रकल्पांना पाठिंबा दिला आहे. संयुक्त राष्ट्र आमसभेच्या ७८ व्या सत्राचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस म्हणाले की, सध्याच्या महामारीच्या प्रभावामुळे आर्थिक क्षेत्रातील मंदीच्या काळात हे छोटे पाऊल नाही. भारताची लोकसंख्या जगातील एक षष्ठांश आहे आणि संयुक्त राष्ट्रांसह जागतिक मिशनमध्ये भारताची अतुलनीय भूमिका आहे.