किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 31° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31° से.
27.43°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– विमानात घेतला यहुदींचा शोध,
मॉस्को, (३१ ऑक्टोबर) – इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. असे असतानाच रविवारी दागिस्तानच्या दक्षिण रशियन भागातील मखाचकला शहरातील विमानतळावरील धावपट्टीवर अचानक पॅलेस्टाईन समर्थक पोहोचले. यावेळी आंदोलकांनी धावपट्टी बंद केली. त्यानंतर रशियन एव्हिएशन अॅथॉरिटी रोसाविएत्सियाने दागिस्तान प्रदेशातील मखाचकलाला जाणारी सर्व उड्डाणे इतर विमानतळांवर वळवली.
स्थानिक वृत्तानुसार, हे लोक गाझामध्ये इस्रायलच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी जमले होते. आंदोलकांचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे, ज्यात आंदोलकांचे मोठे गट एअर टर्मिनलमध्ये प्रवेश करताना आणि नंतर आतल्या सर्व खोल्या पाडताना दिसत आहेत. पॅलेस्टिनी ध्वज फडकावत आंदोलकांनी विमानतळाच्या इमारतीवर धडक दिली आणि अल्लाहू अकबरचा नारा दिला. येथे त्यांनी सेमिटिक विरोधी घोषणा दिल्या आणि तेल अवीव, इस्रायल येथून येणार्या विमानातून आलेल्या यहुदी लोकांचा शोध घेतला.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आंदोलक जबरदस्तीने दरवाजे उघडत आहेत, कॅमेर्याच्या मागचा माणूस शिवीगाळ करीत दरवाजा उघडण्यास सांगत आहे. यावेळी त्याचा विमानतळ कर्मचार्यांवर संताप व्यक्त होत आहे. एक स्त्री रशियन भाषेत म्हणत आहे, येथे एकही इस्रायली नाही. आंदोलकांचा उद्देश इस्रायली नागरिकांवर हल्ला करण्याचा होता, असा दावा अनेक वृत्तामध्ये करण्यात आला आहे.
दागिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, या सार्या प्रकारामुळे २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये पोलिस अधिकारी आणि नागरिकांचा समावेश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आंदोलकांवर कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे, परिस्थिती पाहता इस्रायलने रशियन अधिकार्यांना इस्रायली आणि यहुदींचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. जेरुसलेममधील परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मॉस्कोमधील इस्रायली राजदूत रशियन अधिकार्यांसोबत काम करत आहेत. इस्रायली नागरिकांना आणि यहुदींना कोठेही इजा करण्याचा कोणताही प्रयत्न इस्रायल गांभीर्याने घेतो.
इस्रायलची अपेक्षा आहे की, रशियन कायद्याची अंमलबजावणी करणार्या अधिकार्यांनी सर्व इस्रायली नागरिकांचे आणि यहुदींचे संरक्षण करावे, ते कोणीही असोत. दंगलखोर असो की मग यहुदी आणि इस्रायली लोकांविरुद्ध बेलगाम भडकावणारे असोत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे स्टेट डिपार्टमेंटच्या निवेदनात म्हटले आहे.