किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (२७ जानेवारी) – वयाच्या ४० वर्षांनंतर अँटिबायोटिक्स थोडे जपून खा, कारण त्यांच्यामुळे आतड्यांसंबंधी दाहक रोग (आयबीडी)होण्याचा धोका ४८ टक्क्यांनी वाढतो. गुट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, एक ते दोन वर्षांपर्यंत पोट किंवा आतड्यांसंबंधी संसर्गास लक्ष्य करणारे अँटीबायोटिक्स घेतल्यानंतर हा धोका वाढतो. न्यूयॉर्क विद्यापीठातील संशोधकांनी सुमारे ६.१ दशलक्ष डॅनिश लोकांच्या आरोग्य डेटाचे विश्लेषण केले. याद्वारे असे आढळून आले की, जे लोक कोणत्याही कारणास्तव सतत प्रतिजैविकांचा वापर करतात, त्यांना आयबीडी (अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रॉन्स डिसीज)ची जोखीम प्रतिजैविक न घेतलेल्या लोकांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढली होती.
संशोधकांनी २०००-२०१८ दरम्यान १० ते ६० वयोगटातील ६.१ दशलक्ष लोकांचा अभ्यास केला. त्यापैकी ५५ लाखांना डॉक्टरांनी प्रतिजैविके लिहून दिली होती. प्रतिजैविक घेतलेल्या लोकांपैकी, ३६,०१७ लोकांना अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि १६,८८१ लोकांना क्रोहन रोगाची लक्षणे दिसली. १०-४० वयोगटातील लोक ज्यांनी प्रतिजैविक घेतले होते त्यांना प्रतिजैविक न दिल्या गेलेल्या लोकांपेक्षा खइॄ होण्याची शक्यता ४० टक्के जास्त होती. त्याच वेळी, ४० ते ६० वर्षे वयोगटातील लोकांमध्ये हा धोका ४८ टक्के जास्त असल्याचे दिसून आले. १-२ वर्षे अँटीबायोटिक्स घेतल्यानंतर आयबीडीचा धोका सर्वाधिक असल्याचेही या अभ्यासातून समोर आले आहे. या कालावधीत, १०-४० वर्षे वयोगटातील लोकांमध्ये आयबीडीचा धोका ४० टक्के जास्त असल्याचे आढळून आले. त्याच वेळी, ४० ते ६० वर्षे वयोगटातील ४८ टक्के लोकांमध्ये आयबीडीचा धोका आढळून आला.
याव्यतिरिक्त, अभ्यासात प्रतिजैविक प्रकार पाहिले. आयबीडीचा सर्वाधिक धोका नायट्रोइमिडाझोल आणि फ्लुरोक्विनोलोनशी संबंधित होता. ते सामान्यतः आतड्यांसंबंधी संक्रमणाच्या उपचारांमध्ये वापरले जातात. नायट्रोफुरंटोइन हे एकमेव प्रतिजैविक होते ज्यामुळे खइॄ चा धोका वाढला नाही. अरुंद स्पेक्ट्रम पेनिसिलिन देखील आयबीडीचा धोका वाढवतात असे दिसून आले आहे. या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की प्रतिजैविकांमुळे आतड्याच्या मायक्रोबायोममध्ये मोठे बदल होतात. मात्र, यामागची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. एक गृहितक असा आहे की वयाबरोबर आतड्यांतील मायक्रोबायोममधील सूक्ष्मजंतूंची लवचिकता आणि श्रेणी या दोन्हींमध्ये नैसर्गिक घट होते, ज्यामुळे प्रतिजैविकांचा अधिक गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.