किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलमुंबई, (१४ ऑगस्ट) – मेदापासून बनलेल्या पिझ्झा, बर्गर यांसह बेकरी उत्पादनांच्या अधिक सेवनाने दरवर्षी ५ लाख ४० हजार व्यक्तींचा मृत्यू होत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत दिली. पिझ्झा, बर्गर तसेच बेकरीत तयार होणार्या विविध पदार्थांवर लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत केवळ जिभेची चव पुरविण्यासाठी तुटून पडतात. परंतु, या पदार्थांमुळे ट्रान्स फॅटी सिड (अपायकारक मेद) शरीरात जातात.
जास्त सेवन केल्याने मृत्यू होण्याचा धोका ३४ टक्के आणि हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका २८ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. पिझ्झा, बर्गर, बेकरी उत्पादने सोबतच स्वयंपाकात वापरले जाणारे विविध प्रकारचे तेल, सॉस, जॅमसारख्या माध्यमातून मेद शरीरात जात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले असल्याचे आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले.
शरीराचे नुकसान
जागतिक स्तरावर दरवर्षी सुमारे पाच अब्ज नागरिकांना अपायकारक मेदामुळे हृदयविकाराच्या धोक्याला सामोरे जावे लागते. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) प्रकाशित केलेल्या अहवालात पिझ्झा, बर्गर आदींच्या आहारी गेलेल्या नागरिकांना तीव‘ हृदयविकार, हृदयविकाराचा झटका तसेच मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो. भारतातील ४.६ टक्के हृदयरोगाचे मृत्यू अति मेदाच्या सेवनासंबंधित असू शकतात, अशीही भीती आरोग्य मंत्री मांडविया यांनी व्यक्त केली.
डब्ल्यूएचओचे निरीक्षण
-प्रक्रियायुक्त खााद्यपदार्थांत एकूण चरबीच्या प्रमाणात मेद २ टक्क्यांपेक्षा कमी असावा.
-हायड्रोजनेटेड तेलांच्या वापरावर कठोर बंदी लागू करण्यात यावी.
-आपल्या पोटात जाणारा पिझ्झा अनेक आजारांना निमंत्रण देणारा.
-निरोगी राहायचे असल्यास जंक फूड टाळा.