|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 28.48° से.

कमाल तापमान : 29.99° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 58 %

वायू वेग : 4.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

29.99° से.

हवामानाचा अंदाज

27.34°से. - 30.71°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.15°से. - 29.76°से.

रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.65°से. - 30.93°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.1°से. - 31.17°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.59°से. - 30.7°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.71°से. - 30.37°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home » क्रीडा » ब्रायन लाराने स्वीकारली विंडीज संघाची नवीन जबाबदारी

ब्रायन लाराने स्वीकारली विंडीज संघाची नवीन जबाबदारी

सेंट जॉस, (२७ जानेवारी) – महान फलंदाज ब्रायन लाराने वेस्ट इंडिजच्या तिन्ही स्वरुपाच्या क्रिकेटमध्ये खेळाडू आणि प्रशिक्षकांना मदत करण्यासाठी ‘परफॉर्मन्स मेंटॉर’ म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास सहमती दर्शविली आहे, असे क्रिकेट वेस्ट इंडिजने(सीडब्ल्यूआय)सांगितले. गत वर्षीच्या टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या फेरीत वेस्ट इंडिजचे आव्हान संपुष्टात आले होते.
त्यामुळे संघाच्या पुनरावलोकनासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा सदस्य ५३ वर्षीय ब्रायन लारा आता खेळाडूंना रणनीतीचा सल्ला देण्यासाठी व त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी मुख्य प्रशिक्षकांना मदत करेल, असे सीडब्ल्यूआयने एका निवेदनात म्हटले आहे. माजी कर्णधार लारा क्रिकेट संचालक जिमी अ‍ॅडम्स यांच्यासोबत विश्वचषकाच्या पूर्वतयारीवर काम करेल, असेही त्यांनी सांगितले. मी खेळाडूंना त्यांच्या खेळाकडे बघण्याचा मानसिक दृष्टीकोन बदलण्यासाठी व त्यांच्या डावपेचांसह अधिक यशस्वी होण्यासाठी मदत करू शकतो, असा विश्वास लाराने व्यक्त केला आहे. लाराची पहिली नियुक्ती झिम्बाब्वेमध्ये ४ फेब्रुवारीपासून बुलावायो येथे सुरू होणारी दोन कसोटी सामन्यांची मालिका असेल.

Posted by : | on : 28 Jan 2023
Filed under : क्रीडा
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g