किमान तापमान : 28.76° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 5.62 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.43°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.65°से. - 29.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनेमबाजीत अवनीला, भालाफेकमध्ये सुमितला सुवर्णपदक,
टोकियो, ३० ऑगस्ट – भारताच्या अवनी लेखरा व सुमित अंतिलने आज सोमवारी सुवर्ण कामगिरी केली. अवनीने येथे महिलांच्या केआर-२ १० मीटर एअर रायफलच्या क्लास एसएच १ प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. अवनी लेखरा नेमबाजीत सुवर्णपदक प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे, तर भालाफेकच्या एफ-६४ प्रकारात सुमित अंतिलने विश्वविक्रम मोडत भालाफेकमध्ये भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले.
जयपूर येथे राहणार्या १९ वर्षीय अवनीला २०१२ मध्ये कार अपघात झाला होता. तिने २४९.६ गुण मिळवून विश्वविक्रमाची बरोबरी साधली असली तरी पॅरालिम्पिकमध्ये तिचा विक्रम प्रस्थापित झाला आहे. पहिल्यांदाच पॅरालिम्पिकमध्ये भाग घेणार्या व जगात पाचव्या क्रमांकावर असलेल्या अवनीने पात्रता आणि अंतिम दोन्ही फेर्यांमध्ये १० पेक्षा जास्त गुण प्राप्त केले.
भालाफेकपटू सुमित अंतिलने पुरुषांच्या एफ ६४ प्रकारात विश्व विक्रम मोडत भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. हरयाणाच्या सोनिपत येथील २३ वर्षीय सुमितने पाचव्या प्रयत्नात ६८.५५ मीटर दूर भाला फेकला. सुमितचा हा विश्व विक्रम झाला आहे. २०१५मध्ये मोटारसायकल अपघातात सुमितने डावा पाय गमावला होता.
स्टार पॅरा ऍथ्लिट आणि दोन वेळा सुवर्णपदक विजेते देवेंद्र झाझरिया यांनी भालाफेेक स्पर्धेत सोमवारी रौप्यपदक पदक, थाळीफेक स्पर्धेत योगेश कथुनियानेदेखील द्वितीय स्थान प्राप्त करीत रौप्यपदकावर नाव कोरले. रौप्यपदकांच्या साथीला कांस्यपदक प्राप्त करीत सुंदर सिंह गुर्जरने भारताचा नावलौकिक वाढविला.