किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलराजकोट, [१४ नोव्हेंबर] – अत्यंत कठिण पस्थितीत सामना अनिर्णीत ठेवण्याचे कौशल्य आमच्यात आहे. त्यामुळे टिकाकारांना कोणतीही टिका करण्याची संधीच नाही असे परखड मत भारताचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. इंग्लंडविरुध्दची पहिली कसोटी अनिर्णीत सुटल्यानंतर विराट कोहली पत्रकारांशी बातचित करीत होता.
भारताचे एक-एक गडी तंबूत परतत असताना भारतावर पराभवाचे ढग पसरले होते. पण त्या प्रतिकूल स्थितीतही कर्णधार कोहलीने दुसर्या डावात नाबाद ४९ धावांची लढवैया खेळी केली. रवीन्द्र जडेजा याने चांगली साथ दिली. जडेजाने ३२ धावा काढल्या. या डावातील खेळाकडे बघता आता आम्हाला सामना कसा अनिर्णीत ठेवता येईल याची जाणीव झाली, कल्पनाही आली.
रवीन्द्र जडेजाशी बोलताना विराटने त्याला चिवट फलंदाजी करण्याचा सल्ला दिला. तो याच कारणास्तव. सामना अनिर्णीत ठेवण्याचे तंत्र आमच्याजवळ आहे ही खेळी विराट व रवीन्द्र यांनी मोठ्या खुबीने यशस्वीपणे खेळून काढली व सामना बरोबरीत सुटला.
खेळपट्टीवर आम्ही जेव्हा गवत बघितले, त्यावेळी आम्ही फारच बेचैन झालो याकडे लक्ष वेधून विराट कोहली म्हणाला की, खेळपट्टीवर गवत असते, ती येतेही. पण मोठ्या प्रमाणात गवत दिसताच बेचैनीने मनात घर करावयास सुरुवात केली होती. अशा घटना घडावयास नको होत्या. खेळपट्टी ही फलंदाजांनाच अनुकुल होती अशी स्पष्ट कबुलीही विराटने एका उत्तरात दिली.
खेळातील तिसर्या दिवसाच्या अंतिम सत्रातच खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करीत होती. याची जाणीव झाली होती. काही चेंडू उसळीही घेत होते. त्यामुळे संघातील ऑफ स्पिनरला ही खेळपट्टी अनुकूल ठरत होती. खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करीत होती. त्याकडे बघता भारतीय संघातील अमित मिश्रा, रवीन्द्र जडेजा, रविचंद्रन अश्विन या तिघांवर पाहुण्या इंग्लंड संघातील फिरकीपटूंनी आघाडी घेतली होती. हे मान्य करावेच लागले.