किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलसुपरस्टार रजनीकांत यांना केवळ दक्षिणेतच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही त्यांच्या चाहत्यांची खूप पसंती आहे. ७२ वर्षीय रजनीकांत पुन्हा एकदा ’जेलर’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित, हा तमिळ चित्रपट १० ऑगस्ट रोजी निर्मात्यांनी संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कमाई चांगली आहेच;तरी जगभरातील कमाईच्या बाबतीत साऊथ सुपरस्टार रजनीकांतच्या ’जेलर’ चित्रपटाने सनी देओलच्या ’गदर २’ला देखील मागे टाकले आहे.
’जेलर’ हा चित्रपट मूळ तामिळ भाषेत बनवला आहे. या चित्रपटात रजनीकांत व्यतिरिक्त तमन्ना भाटिया, जॅकी श्रॉफ आणि साऊथ स्टार मोहन यांच्यासह अनेक बड्या स्टार्सनी काम केले आहे.गरळश्रेअॅ जिथे ’गदर २’ ने हिंदीत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्वांचे षटकार लावलेत, तिथे दक्षिणेत ’जेलर’चा वेग थांबण्याचे नाव घेत नाही आहे. जेलरने रिलीजच्या सातव्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. बुधवारी,चित्रपटाने एका दिवसात तमिळमध्ये सुमारे ११.४५ कोटींचा व्यवसाय केला आणि चित्रपट आता सुमारे १७७ कोटींवर पोहोचला आहे.याशिवाय चित्रपटाची कमाई हिंदीमध्ये २५ लाख, तेलुगूमध्ये ३.१ कोटी आणि कन्नडमध्ये २ लाखांवर पोहोचली आहे.सर्व ठिकाणच्या एकूण कमाईसह, चित्रपटाने आतापर्यंत भारतात सुमारे २२५.६५ कोटींचा व्यवसाय केला आहे.’जेलर’ आणि ’गदर २’ची भारतातील कमाईच्या बाबतीत तुलना होऊ शकत नाही, पण रजनीकांतचा चित्रपट जगभरात कमाईच्या बाबतीत आघाडीवर आहे. माहितीनुसार, ७ दिवसांत या चित्रपटाने जगभरात एकूण ४२० कोटींची कमाई केली आहे, जी ’गदर २’ आणि ’ओह माय गॉड-२’ च्या कलेक्शनपेक्षा कितीतरी जास्त आहे. या चित्रपटाने ऐश्वर्या राय बच्चन आणि चियान विक्रम स्टार’पोनियिन सेल्वन-२’ आणि ’कंतारा’चे रेकॉर्डही तोडलेत. ’जेलर’ ज्या वेगाने जगभरात व्यवसाय करत आहे, ते पाहता हा चित्रपट आगामी काळात अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडू शकतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.