किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलमुंबई : अभिनेता रितेश देशमुखची प्रमुख भूमिका असलेला ‘लयभारी’या चित्रपटाने ‘टाईमपास’ आणि ‘दुनियादारी’ या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढून पहिल्याच दिवशी ३.१० कोटींची कमाई करत नवा विक्रम केला आहे. ‘एक व्हिलन’ चित्रपटातील रितेशचा अप्रतिम अभिनय आणि चित्रपटाला मिळालेल्या यशापाठोपाठ आलेला मराठीतला रांगडा ‘माऊली’ यामुळे हा चित्रपट सगळीकडे गर्दी खेचत आहे. चित्रपटातील ऍक्शन दृश्ये रसिकांना आवडली असून सलमानही छोट्या भूमिकेमध्ये भाव खाऊन गेला आहे. ‘बालक-पालक’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर रितेश देशमुखने आता या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच मराठीच्या अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. या चित्रपटाला मराठीतील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुलचे संगीत असून ‘विठ्ठल-विठ्ठल’ या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावले आहे. ‘लय भारी’ला मिळालेल्या या प्रचंड यशाबद्दल खूप आनंद झाला असल्याचे रितेश देशमुखने म्हटले आहे. ‘लय भारी’ हा चित्रपट पहिल्यांदाच महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, गुजरात आणि मध्यप्रदेशात प्रदर्शित करण्यात आला. मराठीत पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाचे दिवसाला १५०० शो दाखवण्यात येणार होते. मात्र, प्रत्यक्षात बर्याच ठिकाणी प्रेक्षकांच्या मागणीमुळे शोची संख्या वाढवावी लागली आहे.
Short URL : https://vrittabharati.in/?p=14268