किमान तापमान : 29.33° से.
कमाल तापमान : 30.02° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.33° से.
27.34°से. - 30.76°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश=आंध्र सरकारचे ऐतिहासिक पाऊल=
विजयवाडा, [१६ सप्टेंबर] – अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात राबविण्यात आलेल्या नद्या जोडणी अभियानांतर्गत ऐतिहासिक पाऊल उचलताना आंध्रप्रदेश सरकारने गोदावरी आणि कृष्णा या दोन नद्या जोडणीचा प्रकल्प पूर्ण करून आज बुधवारी औपचारिक भेट घडवून आणली.
याप्रसंगी आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू उपस्थित होते. इब्राहिमपट्टणम् येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. येथे पश्चिम गोदावरी जिल्ह्यातून वाहणारे गोदावरी नदीचे पाणी कृष्णा नदीत सोडण्यात आले. यावेळी बोलताना नायडू म्हणाले की, प्रख्यात अभियंता आणि माजी केंद्रीय मंत्री के. एल. राव यांनी अनेक दशकांपूर्वी अशा प्रकारचा विचार व्यक्त केला होता. आज तो प्रत्यक्षात साकारला आहे. हा एक ऐतिहासिक असाच क्षण आहे.
कृष्णा आणि गुंटूर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या कृष्णा खोर्यातील शेतकर्यांना या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे मोठा फायदा मिळणार आहे. कारण, कृष्णा पट्ट्यातील शेतकर्यांना गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागला आहे. गोदावरी आणि कृष्णा या दोन नद्यांच्या भेटीमुळे दोन्ही खोर्यांमधील पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे