किमान तापमान : 28.43° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.65°से. - 29.75°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.04°से. - 29.71°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश=प्रशांत भूषण, योगेंद्र यादव राजकीय समितीतून बाहेर?, बुधवारी निर्णय=
नवी दिल्ली, [२ मार्च] – ऐतिहासिक विजयासह दिल्लीत सत्तेवर येऊन एक महिनाही पूर्ण न झालेल्या आम आदमी पार्टीत दोन गट पडले आहेत. पक्षाचे देणगीदार कोण, याबाबतची माहिती पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर टाकण्यात यावी, या मुद्यावरून पक्षात घमासान सुरू झाले असून, या मुद्यावरून बंडाचा झेंडा हाती घेणारे प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांना पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून (पीएसी) बाहेरचा रस्ता दाखविण्याचा निर्णय झाला असल्याची खात्रीलायक माहिती आहे. येत्या बुधवारी पक्षाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
अगदी गेल्या आठवड्यापर्यंत पक्षाचे महत्त्वाचे आधारस्तंभ समजले जाणार्या या दोन्ही नेत्यांवर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांना पक्षाच्या राजकीय समितीवरून डच्चू देण्यात आला असून, याबाबतची औपचारिक घोषणा बुधवारच्या बैठकीत केली जाणार असल्याचे पक्षाचे नेते संजय सिंह यांनी सांगितले.
आपण पक्षविरोधी कारवाया केलेल्या नाहीत. पण, ‘आप’ला देणग्यांच्या रूपात जो पैसा प्राप्त होतो, त्याचा स्रोत माहीत करून घेण्याचा अधिकार जनतेला आहे. त्यामुळे आपने देणगीदारांची माहिती वेबसाईटवर टाकावी, इतकीच आपली अपेक्षा आहे. अशा प्रकारची इच्छा असणे जर पक्षविरोधी कारवायांचा भाग आहे, तर मला यावर काहीच बोलायचे नाही, असे सांगत योगेंद्र यादव यांनी पक्षात दोन गट असल्याच्या वृत्ताचेही खंडन केले आहे. या संदर्भात सोशल नेटवर्किंग साईटवर ज्या बातम्या प्रसारित होत आहेत, त्या खोट्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या आठवड्यात आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय संयोजक पदावरून बाजूला व्हावे, अशा आशयाचा प्रस्ताव त्यात ठेवण्यात आला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला होता. यानंतर प्रशांत भूषण यांनी, सरकारमध्ये अरविंद केजरीवाल यांना अनेक कामे असल्याने योगेंद्र यादव यांची राष्ट्रीय संयोजकपदी नियुक्ती करण्यात यावी, असा प्रस्ताव ठेवला. पण, हा प्रस्तावही एकमताने फेटाळण्यात आला.