किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलमुंबई, [६ मे] – परराज्यातून महाराष्ट्रात येणार्या गोवंश मांस (बीफ) विक्रीला मुंबई उच्च न्यायालयाने आज शुक्रवारी परवानगी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्याचबरोबर बाहेर राज्यातून येणारे गोवंश मांस बाळगताही येणार आहे, तसेच ते खाण्यासही कोणतीही बंदी घातलेली नाही. मात्र, त्याचवेळी राज्यात लागू असलेली गोवंश हत्याबंदी कायम राहणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारने गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला होता. या कायद्यानुसार गोवंश हत्या, गोमांस विक्री, गोमांस बाळगणे आणि त्याचे सेवन करणे या सर्वांवर बंदी घातली होती. या कायद्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. प्रत्येक व्यक्तिला आपल्या आवडीचे अन्न, मासांहार करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. सरकारने त्यावर बंदी आणून नागरिकांचा मूलभूत हक्क हिरावला आहे, अशा आशयाची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने हे निर्देश दिले आहेत. या याचिकेवरील सुनावणीवेळी परराज्यांतून गोमांस आणून ते महाराष्ट्रात बाळगण्याला उच्च न्यायालयाने परवानगी दिली. दरम्यान, मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला आहे.